Navratri Special:  Dainik Gomantak
मनोरंजन

Navratri Special: बॉलिवुडच्या 'या' चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली माता दुर्गापुजेची खास झलक

Puja Bonkile

Navratri Special: आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली असुन देशभरात उत्साहाचे वातावारण आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पुजा केली जाते. बॉलिवूडमध्ये सुद्धा काही चित्रपटांमध्येही दुर्गा पुजेची झलक पाहायला मिळाली आहे. हे चित्रपट कोणते आहेत हे पाहुया.

'देवदास'

जेव्हा जेव्हा दुर्गापूजा चित्रपटांमध्ये दाखवण्याची चर्चा होते तेव्हा संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटाचा उल्लेख नक्कीच होतो. शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात दुर्गापूजा उत्तम पद्धतीने दाखवण्यात आली होती. ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांनी 'दोरा रे डोला'वर नृत्य करून सर्वांची मने जिंकली, तर माँ दुर्गेचा पंडालही अतिशय सुंदर होता. 2002 मध्ये रिलीज झालेला 'देवदास' अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरही पाहता येईल.

कहानी

सुजॉय घोषच्या 2012 मध्ये आलेल्या 'कहानी' चित्रपटात विद्या बालनने मुख्य भूमिका साकरली होती. या चित्रपटाची कथा कोलकात्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ज्यामध्ये लंडनमधील एक महिला आपल्या नवऱ्याला शोधण्यासाठी निघते. कोलकातामध्ये दुर्गा पूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते आणि म्हणूनच ती चित्रपटात शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने सादर केली गेली आहे. तुम्ही Amazon Prime Video वर देखील हा सस्पेन्स भरलेला चित्रपट पाहू शकता.

'रॉकी आणि राणीची प्रेमकथा'

करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने काही महिन्यांपूर्वीच चित्रपटगृहांमध्ये धमाल केली केली होती. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्यात दाखवलेले दुर्गापूजेचे दृश्य कथेसाठी महत्त्वाचे होते. यामध्ये रणवीर माता दुर्गेची पूजा केल्यानंतर कथ्थक करताना दिसत आहे आणि नंतर तो 'धिंडोरा' गाण्यावर डान्सही करतो. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.

परिणीता

2005 मध्ये आलेल्या 'परिणीता' चित्रपटाची कथाही शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित होती. या चित्रपटात विद्याबालनसोबत सैफ अली खान आणि संजय दत्त यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. या चित्रपटातही कोलकाता अतिशय बारकाईने दाखवण्यात आले असून दुर्गापूजेदरम्यान केले जाणारे विधीही पडद्यावर भव्य पद्धतीने दाखवण्यात आले आहेत. तुम्ही Amazon Prime Video वर देखील या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.

इतर चित्रपट

2013 चा 'लुटेरा' दुर्गा पूजेने सुरू होतो आणि पाखी म्हणजेच सोनाक्षी सिन्हाच्या कुटुंबाची ओळख करून देतो. जे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. याशिवाय कोलकात्याच्या पार्श्वभूमीवर आधारित 'गुंडे' या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रा दुर्गा पूजा पंडालमध्ये तिच्या प्रियकराची वाट पाहत आहे. 'लुटेरा' MX Player वर तर 'गुंडे' Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT