RRR   Dainik Gomantak
मनोरंजन

Natu Natu Song: 'नाटू नाटू' यंदादेखील ऑस्करमध्ये ! जाणून घ्या काय आहे कारण

Natu Natu Song: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षात एकापेक्षा एक चित्रपटांची निर्मिती करत मनोरंजनसृष्टीत मैलाचा दगड रोवला आहे.

दैनिक गोमन्तक

Natu Natu song shines again at oscars

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षात एकापेक्षा एक चित्रपटांची निर्मिती करत मनोरंजनसृष्टीत मैलाचा दगड रोवला आहे. मार्च २०२२ मध्ये रिलिज झालेल्या आरआरआर चित्रपटाने तर जगभरात भारतीय चित्रपटसृष्टीचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

गेल्यावर्षी ऑस्करमध्येदेखील आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट सॉंग कॅटॅगरीत पुरस्काने गौरविले होते. महत्वाचे म्हणजे, यावर्षीदेखील म्हणजेच हे गाणे लॉस एंजिल्स पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात पुन्हा एकदा दाखवले गेले. ऑस्कर पुरस्कार मिळालेले नाटू नाटू हे पहिले भारतीय गाणे ठरले आहे. महत्वाचे म्हणजे, यावर्षीदेखील या कॅटॅगरीमध्ये पुरस्कार देताना नाटू नाटू हे गाणे पुन्हा दाखवत ट्रिब्यूट दिले आहे.

आरआरआर या ॲक्शन चित्रपटात ज्युनियर NTR आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. प्रत्येक सिनेप्रेमीच्या हृदयात या चित्रपटांसाठी एक खास स्थान आहे. आता ऑस्करमध्ये या गाण्याची पुन्हा एकदा दखल घेतली गेल्याने भारतीयांची मान उंचावली आहे. या चित्रपटाने भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेले आणि 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी ऑस्करसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जिंकले.

बिली इलिश आणि फिनीस ओ'कॉनेल यांनी ऑस्कर 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट गाणे पुरस्कार जिंकला आहे. 'बार्बी द अल्बम' मधील 'व्हॉट वॉज आय मेड फॉर?' साठी पुरस्कार देण्यात आला. यादरम्यान केवळ 'नाटू नाटू'च नव्हे, तर ऑस्करने चित्रपटांमधील जगातील सर्वात महान स्टंट दृश्यांना ट्रिब्यूट दिले आहे. सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी ऑस्कर जिंकणारे पहिले भारतीय गाणे ठरल्याने 'नाटू नाटू ने इतिहास रचला. एमएम कीरावानी आणि चंद्रबोस यांनी मंचावर येऊन हा पुरस्कार स्वीकाराल्याचे पाहायला मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

Lonavala Accident: लोणावळ्यात भीषण अपघात..! अनियंत्रित कारची ट्रकला धडक, गोव्यातल्या दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू

मुरगावच्या SGPDA मच्छी मार्केटमध्ये प्रचंड अस्वच्छता! डासांची पैदास वाढल्याने स्थानिकांचा संताप

IND vs SA: 'शतकवीर' क्विंटन डी कॉक! टीम इंडियाविरुद्ध 'असा' विक्रम करणारा पहिला आफ्रिकन खेळाडू

Aquem Fire: आके येथील फास्ट फूड सेंटरला मध्यरात्री भीषण आग; 25 लाखांचे नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT