8 जून हा दिवस अमेरिकेत 'राष्ट्रीय बेस्ट फ्रेंड डे' म्हणून साजरा केला जातो. मैत्री हे एक अतुट नातं आहे. हे एक असे नाते आहे जिथे बिनशर्त विश्वास ठेवतो. आपण आनंद किंवा दुःख त्याच्याजवळ शेअर करत असतो. मैत्रीवर आधारित सुपरहिट बॉलिवूड चित्रपट कोणते हे जाणुन घेऊया.
* दोस्ती (1964) Dosti
सत्येन बोस दिग्दर्शित हा कृष्णधवल चित्रपट (Movie) दोन मुलांमधील मैत्रीवर आधारित होता. एक आंधळा आणि दुसरा अपंग. रामू अपघातात जखमी होऊन अपंग होतो. त्याच्या पालकांच्या दुःखद मृत्यूनंतर, त्याला त्याच्या घरातून हाकलून दिले जाते आणि तो मुंबईच्या (Mumbai) रस्त्यांवर फिरत असताना त्याला मोहन भेटतो. रामू हार्मोनिका वाजवण्यात चांगला आहे, तर मोहन चांगला गायक असतो आणि दोघे मिळून पैसे कमावण्यासाठी रस्त्याच्या कडेला गाणी गातात. हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहा.
* शोले (1984) Sholay
प्रसिद्ध अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट शोले (Sholay) हा दोन गुन्हेगार, जय आणि वीरू यांच्या मैत्रिवर आधरित आहे. अमिताभ बच्चन, धर्मेद्र आणि हेमा मालिनी मुख्य भुमिकेत आहेत. या चित्रपटामधील "ये दोस्ती" गाणं प्रसिद्ध आहे.
* कुछ कुछ होता है (1998) Kuch Kuch Hota Hai
करण जोहर (Karan Johar) दिग्दर्शित, या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल यांची लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोडी मुख्य भूमिकेत होती. "प्यार दोस्ती है" या चित्रपटातमधील सर्वात प्रसिद्ध डायलाॅग आहे. हा चित्रपटा आज सुध्दा लोकप्रिय आहे.
* 3 इडियट्स (2009) 3 Idiots
राजकुमार हिरानी दिग्दर्शित कॉमेडी-ड्रामा चित्रपटात आमिर खान (Aamir Khan) , आर माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर, बोमन इराणी आणि ओमी वैद्य हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये मैत्रीचा सुंदर प्रवास दाखवला आहे.
* जिंदगी ना मिलेगी दोबारा (2011)Zindagi Na Milegi Dobara
चित्रपटाची कथा तीन बालपणीचे मित्र अर्जुन, कबीर आणि इमरानची आहे. जे तीन आठवड्यांच्या बॅचलर रोड ट्रिपसाठी पुन्हा एकत्र येतात. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, अभय देओल, फरहान अख्तर, कतरिना कैफ आणि कल्की कोचलिन प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.