Nana Patekar Dainik Gomantak
मनोरंजन

Nana Patekar Kargil War Story: दुष्मनांसमोर छाती ठोकपणे उभे राहिले, संरक्षण मंत्र्यांकडून घेतली होती विशेष परवानगी; नाना पाटेकरांच्या आयुष्यातील 'तो' थरारक प्रसंग

Indian Army Connection And 1999 Kargil War Service: नाना हे केवळ त्यांच्या जबरदस्त ताकदीच्या अभिनयासाठीच नव्हे, तर भारतीय सैन्याप्रती असलेल्या त्यांच्या देशप्रेमासाठी देखील जगभर ओळखले जात होते.

Manish Jadhav

Nana Patekar Kargil War Story: भारतीय चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली. आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अनेक दशके राज्य करणारे लोकप्रिय दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली.

नाना हे केवळ त्यांच्या जबरदस्त ताकदीच्या अभिनयासाठीच नव्हे, तर भारतीय सैन्याप्रती असलेल्या त्यांच्या देशप्रेमासाठी देखील जगभर ओळखले जात होते. त्यांचा हा लष्करी प्रवास फक्त पडद्यापुरा मर्यादित नव्हता, तर खऱ्या आयुष्यातही त्यांनी सैन्यासोबत कठीण प्रसंग अनुभवले होते. 1999 मधील कारगिल युद्धादरम्यान त्यांनी भारतीय सैनिकांसोबत तब्बल 60 दिवस घालवले होते, ज्याची आजही आवर्जून आठवण काढली जाते. त्यांच्या या लष्करी जिव्हाळ्याची सुरुवात त्यांच्या गाजलेल्या ‘प्रहार’ या चित्रपटाच्या वेळी झाली होती, ज्यासाठी त्यांनी मराठा लाइट इन्फ्रंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये अत्यंत कठोर कमांडो ट्रेनिंग घेतली होती.

पुढे कारगिल युद्ध (Kargil War) सुरु असताना त्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्र्यांकडे सैन्यासोबत जाण्याची विशेष परवानगी मागितली होती. त्यांची एनसीसी ट्रेनिंग, शूटिंगमधील नैपुण्य आणि राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटिंगचे पदक पाहता त्यांना युद्धाच्या संवेदनशील भागात जाण्याची परवानगी मिळाली. त्यांनी द्रास, लेह, कुपवाडा आणि सोपोर सारख्या भागांत जाऊन प्रत्यक्ष भारतीय जवानांसोबत कठीण परिस्थितीत दिवस घालवले होते. त्यांच्या निधनाने मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीने एक महान कलाकार, शिस्तप्रिय व्यक्ती आणि उत्तम देशप्रेमी माणूस गमावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Freedom Fighter: 10 वर्षांचा एकांतवास, मृत्यूची खोटी बातमी अन् मायभूमीची ओढ; गोव्याचे लोहपुरुष नारायण हरी नाईक यांची संघर्षगाथा

DA Hike: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची मोठी भेट! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत चार बडे निर्णय

Train Accident: दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर जोरदार धडक, 46 प्रवाशांचा जागीच मृत्यू; अनेकजण जखमी VIDEO

ICC Ranking मध्ये मोठी उलथापालथ! इशान किशनला मागे टाकत अभिषेक शर्मा टी-20चा नवा किंग; पटकावले अव्वल स्थान

FD Maturity Rules: मुदतपूर्तीनंतर एफडीचे पैसे काढले नाहीत तर काय होते? जाणून घ्या रिझर्व्ह बँकेचा मोठा नियम

SCROLL FOR NEXT