Munawar Faruqui  Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17: कोणाबरोबरच रिलेशन नको, ना आयशा ना नाजिला...मुनव्वर स्पष्टच बोलला

Bigg Boss 17: आजच्या ५ जानेवारीच्या एपिसोडमध्ये मुनवर फारुकी आणि आयशा खान यांच्यात जोरदार विवाद होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये मुनव्वर त्याच्या नात्याबद्दल बोलत आहे.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात सतत वादविवाद होताना दिसत असतात. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी भलत्याच चर्चेत आहे.

सुरुवातीला त्याचा आखेळ चांगला चालला होता, पण त्याची कथित गर्लफ्रेंड आयेशा खान शो मध्ये आली आणि मुनव्वरचा गेम बिघडल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही एपिसोड्सपासून मुनव्वर आणि आयेशाचे वाद पाहायला मिळत होते, पण जेव्हा सलमानने वीकेंड का वारमध्ये आयेशाचा क्लास सुरू केला त्यानंतर मुनव्वरचे वागणे बदलल्याचे पाहायला मिळाले. आता त्याने आयशासोबतचे नाते संपवले आहे. तो म्हणतो की त्याला कोणाशीही रिलेशनशिपमध्ये राहायचे नाही.

आजच्या ५ जानेवारीच्या एपिसोडमध्ये मुनवर फारुकी आणि आयशा खान यांच्यात जोरदार विवाद होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये मुनव्वर त्याच्या नात्याबद्दल बोलत आहे.

जेव्हा आयशा खानने मुनव्वरच्या वागणुकीत अचानक बदल झाल्याचा आरोप केला, तेव्हा त्याने उत्तर दिले की दोघांचे एकमेकांसोबत राहणे योग्य नाही. त्यामुळे दोघांनी वेगळे राहावे.

इतकंच नाही तर मुनव्वरने आयशा खानसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नसल्याचेही सांगितले. तो म्हणतो, 'मला ना नाझिलासोबत राहायचे आहे आणि ना आयशासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे. हे ऐकून आयशा भडकते आणि म्हणते तो शो जिंकला तरी तो कधीच नाते बनवू शकत नाही किंवा टिकवू शकत नाही.

दरम्यान, जेव्हा आयशा शोमध्ये आली तेव्हा मुनव्वर तिच्याबरोबर पॅचअप करून पुन्हा लग्न करण्याबाबतही तो बोलला. 15 दिवस तो फक्त आयशामध्येच हरवला होता, पण गेल्या वीकेंड का वारमध्ये सलमानने आयेशाचा क्लास घेतला आणि तिची चूक लक्षात आली. तेव्हापासून मुनव्वरच्या वागण्यात बदल झाला. आता तो आयशापासून लांब दिसतोय. अशा परिस्थितीत एका रात्रीत तिच्या भावना कशा बदलल्या, असा सवाल आयशा उपस्थित करत आहे.

दरम्यान, सर्मथला कानाखाली मारल्याप्रकरणी अभिषेकबाबत काय निर्णय घ्यायचा हे बिग बॉस अंकिताकडे सोपवले व अंकिताने अभिषेकला घरी पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शूटिंगनंतर कुठे गायब झालाय अक्षय खन्ना? 167 कोटींची मालमत्ता असलेला 'रहमान' राहतोय अलिबागमध्ये; स्वर्गाहून सुंदर फार्महाऊस!

Goa Fire: थिवीत 'अग्निकांड', शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; 5 लाखांचे नुकसान!

Salt Lake Stadium: ममता बॅनर्जींनी मागितली मेस्सीची माफी; मैदानावर घडलेल्या घटनेबाबत व्यक्त केली नाराजी, चौकशी समिती स्थापनेचे आदेश

Goa Nightclub Fire: 'रोमिओ लेन' क्लबचे 18 महिने बेकायदेशीर ऑपरेशन; दिड वर्ष कोणाचेही लक्ष नव्हते?

Goa Live Updates: वागातोर येथील 'CO2 क्लब' सील

SCROLL FOR NEXT