Mumtaz Dainik Gomantak
मनोरंजन

चित्रपटात पुनरागमन करण्याबाबत मुमताज यांनी सांगितली 'ही' मोठी गोष्ट

या सगळ्यामध्ये मुमताज यांनी चित्रपटांमध्ये दिसण्याबाबत एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

दैनिक गोमन्तक

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री मुमताज दीर्घकाळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. 60 आणि 70 च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयाने लाखो मने जिंकली. मुमताज (Mumtaz) सध्या भारतापासून दूर कुटुंबासह परदेशात आहेत. या सगळ्यामध्ये त्यांनी चित्रपटांमध्ये दिसण्याबाबत एक मोठी गोष्ट सांगितली आहे, हे जाणून घेतल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. (Mumtaz Latest News Update)

रविवारी, मुमताज यांची मुलगी तान्या माधवानीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लाईव्ह सेशन आयोजित केले. यावेळी या ज्येष्ठ अभिनेत्रीने त्यांच्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मुमताज यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील इतर अनेक गोष्टींबद्दल सांगितले. त्यांनी आपल्या नातवासोबत आणि मुलीसोबत कसा वेळ घालवतात हे सांगितले. यादरम्यान मुमताज यांनी चित्रपटात पुनरागमन करण्याबाबत चाहत्यांना एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री म्हणाल्या, 'मला माहित नाही, माझ्या हृदयाला स्पर्श करणारी, खूप छान आणि लोकांची प्रशंसा करणारी भूमिका मला मिळाली तर कदाचित मी करेन. पण आधी मला माझ्या पतीची परवानगी घ्यावी लागेल. जर त्याने मला परवानगी दिली तर तूम्ही मला नक्की पाहाल.' याशिवाय मुमताजने चाहत्यांशी बरेच काही बोलून दाखवले. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांच्या मुलीने एक खास कॅप्शनही लिहिलं आहे.

तान्या माधवानीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'मुमताजसोबत! हे अचानक लाइव्ह नियोजित नव्हते, पण पुढच्या आठवड्यात लाईव्ह करेल! ती तुम्हा सर्वांवर प्रेम करते आणि सर्वांचे प्रेम वाचून खूप आनंद झाला.' मुमताज यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिग्गज अभिनेत्रीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की मुमताज या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून त्यांनी खूप नाव कमावले. मुमताज 60 आणि 70 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होत्या. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. 1958 मध्ये आलेल्या सोनी की चिडिया या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. मुमताजने 1974 मध्ये बिझनेसमन मयूर माधवानीसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकल्याच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT