Sunny Deol Dainik Gomantak
मनोरंजन

Sunny Deol: '...अन् सनीच्या हातावर मी तलवार मारली,' मुकेश ऋषींनी सांगितली 'त्या' घटनेची आठवण

Sunny Deol: एकदा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डिंपल कपाडियाची धाकटी बहीण सिंपल तिच्यासोबत राहत होती.

दैनिक गोमन्तक

Sunny Deol: चित्रपट कसे तयार होत असतील, पडद्यामागे काय घडत असेल, कलाकार एकमेकांबरोबर कसे वागत असतील, पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांमध्ये कसे नाते असेल अशा अनेक प्रकारचे प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत असतात. पडद्यामागच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता मुकेश ऋषी यांनी घातक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची एक गोष्ट सांगितली आहे. त्यांनी सनी देओलच्या हातावर तलवार मारल्याची आठवण त्यांनी शेअर केली आहे.

1996 मध्ये राजकुमार संतोषी यांचा 'घटक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये सनी देओल महत्त्वाची भूमिका साकारत होता. या शूटिंगची आठवण सांगताना अभिनेता मुकेश ऋषी यांनी सांगितले की, त्याने नकळत सनीच्या हातावर तलवार मारली होती. 'राजश्री अनप्लग्ड'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले की, त्या घटनेनंतरही सनी देओलने त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही.

मुकेश म्हणाले, 'जेव्हा आम्ही घातर चित्रपटाचे शूटिंग करत होतो, तेव्हा टिल्लू वर्मासाहेब आमचे फाईट मास्टर होते. आम्हाला सीन समजावून सांगताना त्यांची शिस्त कडक असायची आणि आपणही त्याच समर्पणाने तो सीन करावा अशी त्याची अपेक्षा असायची.

या चित्रपटात माझ्या आणि सनीमध्ये फाईट सीन होता. आम्हा दोघांना लढण्यासाठी जड तलवारी देण्यात आल्या. पण सीन करताना माझ्याकडून चूक झाली आणि मी तलवार सनीच्या हातावर मारली. सीननंतर लगेचच लंच ब्रेक झाला. पण माझ्या या चूकीमुळे मला टेन्शन आले होते कारण जेव्हा तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही असे स्टंट करु शकता. यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी मी स्वत:ला मारुन घेत होतो, मी काळजीत असणार हे सनीला माहित होते. त्याने एका माणसाला माझ्याकडे पाठवले. तो व्यक्ती म्हणाला सनी साहेबांनी सांगितले आहे की, मी ठीक आहे. त्याची ही पद्धत मला आवडली होती.

मुकेश ऋषींनी सनी देओलबद्दल आणखी एक आठवण सांगितली होती. एकदा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डिंपल कपाडियाची धाकटी बहीण सिंपल तिच्यासोबत राहत होती. तर एके दिवशी सिंपल जी गॅझेट घेऊन फिरत होती. हे गॅझेट आपल्या पाऊलांची म्हणजेच आपण किती चालतो याची नोंद ठेवते. मी फक्त गॅझेटचे कौतुक केले आणि तिला ते कुठे मिळाले ते विचारले. त्यानंतर मी जेव्हा सेटवर गेलो तेव्हा सनी देओलने माझ्यासाठी ते गॅझेट आणून ठेवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Goa Flight: विमानात तांत्रिक बिघाड; दिल्लीतून गोव्याला येत असलेले विमान मुंबईला वळवले

पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

SCROLL FOR NEXT