Mukesh Chhabra Mother On Sushant Singh Rajput Dainik Gomantak
मनोरंजन

Mukesh Chhabra: 'सुशांत अन् माझी आई...' प्रसिद्ध दिग्दर्शकाची भावूक पोस्ट

Mukesh Chhabra: सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' देखील मुकेश छाबरा यांनीच दिग्दर्शित केला होता.

दैनिक गोमन्तक

Mukesh Chhabra: दिवगंत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आपल्या अभिनयाने मनोरंजनसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याच्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत टीव्ही मालिकापासून ते बॉलीवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट देत आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. त्याच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला होता. आजही अनेकजण त्याच्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसत आहेत.

दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी सुशांत सिंग राजपूत आणि त्यांच्या आईचा एक जूना फोटो सोशल मिडियावर शेअर करत त्या दोघांची आठवण येत असल्याती भावूक पोस्ट केली आहे.

दिग्दर्शक मुकेश छाबरा सुशांतच्या खूप जवळ होते. त्या दोघांच्या अनेक आठवणी एकत्र आहेत. सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' देखील मुकेश छाबरा यांनीच दिग्दर्शित केला होता. सुशांतच्या मृत्यूला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण त्याच्यावर प्रेम करणारे लोक आजही त्याची आठवण काढताना दिसतात.

अलीकडेच तो सुशांतच्या आठवणीत हरवला आणि त्याने अभिनेत्याचा न पाहिलेला फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सुशांत मुकेश छाबरा यांच्या आईसोबत बटाट्याचे पराठे खाताना दिसत आहे.

मुकेश छाबरा यांनी हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. आपल्या दिवगंत आई आणि सुशांतची आठवण काढताना आयुष्य खूप विचित्र असल्याचे म्हटले आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, मला खात्री आहे की ते दोघे अजूनही वरती एकत्र पराठ्यांचा आस्वाद घेत असतील.

'जवान'मध्ये मुकेश छाबरा

मुकेश छाबरा हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहेत. शाहरुख खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जवान' या चित्रपटाचे कास्टिंग त्याने केले. याशिवाय यात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. मुकेश छाबरा हे दिग्दर्शकही आहेत. सुशांत सिंग राजपूतची भूमिका असलेल्या 'दिल बेचारा'मधून त्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सुशांतचा मृत्यू झाला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT