M.S Dhoni: The Untold Story Dainik Gomantak
मनोरंजन

M.S Dhoni: The Untold Story: पुन्हा थिएटर्समध्ये घुमणार हेलिकॉप्टर शॉट, धोनी : द अनटोल्ड स्टोरीबद्दल डिस्ने स्टुडिओचे प्रमुख म्हणाले...

Rahul sadolikar

M.S Dhoni: The Untold Story Set to Re-release: अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा एक चित्रपट क्रिकेटचे चाहते कधीच विसरू शकत नाहीत आणि तो चित्रपट म्हणजे नीरज पांडे दिग्दर्शित एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या चालू हंगामाचा प्रचंड उत्साह आणि या सगळ्यात प्रचंड फेम असणारा आणि चर्चा असणारा चाहत्यांचा लाडका खेळाडू म्हणजे महेंद्रसिंह धोनी.

भारताच्या या माजी क्रिकेट कर्णधाराला लाखो कट्टर चाहते माही म्हणून ओळखतात. त्याला बघुन त्याची क्रेझ कधीही संपणार नाही असंच वाटतं. 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा सुपरहिट स्पोर्ट्स ड्रामाने 12 मे रोजी चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित होणार आहे. 

दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने या चित्रपटात धोनीची साकारलेली भूमीका सर्वांनीच पसंत केली होती., 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा एक ब्लॉकबस्टर बायोपिक आहे जो दिग्गज क्रिकेट स्टार महेंद्रसिंग धोनीचा संघर्ष सांगतो.

रेल्वे तिकीट कलेक्टर होण्यापासून ते क्रिकेटच्या इतिहासात आपलं सोनेरी नाव कोरणारा कॅप्टन कूल असा त्याचा प्रवास या चित्रपटात मांडला आहे.

देशभरातील क्रिकेटप्रेमी आणि धोनीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची आहेच पण दिवंगत बॉलीवूड सुपरस्टार सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनाही हा भावनिक क्षण असणार आहे, कारण चाहत्यांना त्यांच्या लाडक्या सुशांतला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे.

 2020 मध्ये निधन झालेल्या राजपूत, 'दिल बेचारा' या त्याच्या स्वॅन्सॉन्गमध्ये शेवटचा दिसला होता, जो 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या अमेरिकन रोमँटिक ड्रामाचा अधिकृत हिंदी रिमेक होता. 

सुशांत सिंग राजपूत अभिनीत या चित्रपटाला 'अविश्वसनीयपणे खास चित्रपट' असं म्हणुन, चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यामागचे कारण सांगताना, डिस्ने स्टारचे स्टुडिओचे प्रमुख बिक्रम दुग्गल म्हणाले, "एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी केवळ एक चित्रपट नाही.

आमच्या सर्वात यशस्वी क्रिकेट कर्णधाराचा प्रेरणादायी प्रवास दाखवणारा स्टार स्टुडिओसाठी, पण जगभरातील भारतीयांसाठीही अविश्वसनीयपणे खास चित्रपट आहे. पुन्हा रिलीज करण्यामागे देशभरातील त्याच्या चाहत्यांना क्रिकेटचे सर्वात जादुई क्षण पुन्हा अनुभवण्याची संधी देणे हे हा आहे.

नीरज पांडे लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत व्यतिरिक्त कियारा अडवाणी, दिशा पटानी, भूमिका चावला आणि अनुपम खेर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' 12 मे रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT