Oscar official Entry : ऑस्कर हा पुरस्कार मनोरंजन विश्वातला मानाचा पुरस्कार समजला जातो. ऑस्करचा पुरस्कार सोहळा जरी हॉलीवूडपटांसाठी असला तरीही जगभरातल्या अनेक चित्रपटांना ऑस्करसाठी पाठवले जाते.
या वर्षी नाटू नाटू आणि द एलिफंट व्हिस्परर्स या भारतीय कलाकृतींना ऑस्करने सन्मानित करण्यात आलं आहे. 2024 सालच्या पुरस्कारांसाठी भारतातून वेगवेगळ्या भाषेतून प्रवेशिका यायला सुरूवात झाली आहे.
2023 या वर्षाने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी इतिहास रचला, कारण यावर्षी एक नव्हे तर दोन ऑस्कर ट्रॉफीवर भारताने आपले नाव कोरले.
एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला तर गुनीत मोंगा यांच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स' या माहितीपटाला ऑस्कर मिळाला. आता पुन्हा एकदा भारतीय चित्रपट ऑस्करवरवारीसाठी सज्ज झाला आहे.
ऑस्कर 2024 साठी भारताकडून अधिकृत प्रवेशिका पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑस्कर 2024 साठी 22 हून अधिक चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या आहेत.
यामध्ये राणी मुखर्जीचा 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे', विवेक अग्निहोत्रीचा चित्रपट 'द केरळ स्टोरी', सुपरस्टार नानी स्टारर चित्रपट 'दसरा', सनी देओलचा 'गदर 2', कपिल शर्माचा 'झ्वीगॅटो' आणि रणवीर सिंग-आलिया भट्टचा 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या चित्रपटांचा समावेश आहे. कथा' देखील समाविष्ट आहे.
ऑस्कर 2024 साठी भारताच्या अधिकृत प्रवेशाला आता सुरूवात झाली आहे. यामध्ये 'बालागम', 'द केरला स्टोरी', 'झ्वेगोटो' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ऑस्कर समितीने चेन्नईमध्ये अनेक स्क्रीनिंगद्वारे आपली प्रक्रिया सुरू केली असून पुढील आठवड्यापर्यंत अंतिम घोषणा अपेक्षित आहे.
एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'RRR' आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने ऑस्कर जिंकल्यानंतर चित्रपट निर्मात्यांमध्ये प्रोजेक्ट्स निवडण्याचा नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. यामुळेच ते देशातून व्यावसायिक, प्रादेशिक आणि गंभीर सिनेमांचा विचार करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण भारतातून 22 हून अधिक एन्ट्री मिळाल्या आहेत आणि चित्रपट निर्माते गिरीश कासारवल्ली यांच्या नेतृत्वाखालील 17 सदस्यीय ज्युरी ऑस्करसाठी कोणता चित्रपट निवडायचा हे ठरवेल. 96 वा ऑस्कर पुरस्कार 10 मार्च 2024 रोजी होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 'ऑस्कर निवडीसाठी भारतीय फिल्म फेडरेशनकडे पाठवण्यात आलेल्या काही चित्रपटांमध्ये अनंत महादेवनचा 'द स्टोरीटेलर' (हिंदी), 'म्युझिक स्कूल' (हिंदी), 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' यांचा समावेश आहे.
य शिवाय , '12वी फेल' (हिंदी), 'विदुथलाई भाग 1' (तमिळ), 'घूमर' (हिंदी), आणि 'दसरा' (तेलुगु). या यादीत 'वाळवी' (मराठी), 'गदर 2' (हिंदी), 'अब तो सब भगवान भरोसे' (हिंदी), आणि 'बाप ल्योक' (मराठी) या चित्रपटांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
ऑस्कर समितीचे सदस्य चेन्नईला पोहोचले असून या प्रक्रियेबाबत उत्सुकता आहे. सूत्राने सांगितले की, 'स्क्रीनिंग काल सुरू झाले आणि त्याला एक आठवडा लागेल कारण तेथे बरेच चित्रपट पाहिले जातील आणि त्यानंतर निवड प्रक्रिया होईल. आम्ही पुढील आठवड्यात भारताकडून अधिकृत प्रवेशाविषयी घोषणा अपेक्षित करू शकतो.
गेल्या वर्षी, पान नलिनचा गुजराती चित्रपट 'लास्ट फिल्म शो' (छेल्लो शो) 95 व्या अकादमी पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी भारताच्या अधिकृत प्रवेशासाठी नामांकित झाला होता, ज्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.