9/11 Attack Dainik Gomantak
मनोरंजन

9/11 Attack : माय नेम इज खान, वर्थ, द रिपोर्ट..9/11 च्या काळ्या दिवसावर भाष्य करणारे हे चित्रपट पाहाच

तो एक भीषण हल्ला होता, त्या हल्ल्यात 3 हजार लोकांनी प्राण गमावले होते. आज पाहुया या हल्ल्यावर बनलेल्या या कलाकृती...

Rahul sadolikar

11 सप्टेंबर 2001... अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला दहशतवादाचा भस्मासूर दाखवणारा दिवस. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने या दिवशी आपल्या इतिहासातला सर्वात काळा दिवस पाहिला.

या घटनेने लादेन नावाचा दहशतवादी सगळ्या जगाने पाहिला. दहशतवाद किती भयंकर असतो हे एका विध्वंसक रुपात अमेरिकेसह जगातल्या सगळ्या देशांनी पाहिला.

9/ 11 नंतरचे जग

वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवर झालेल्या हल्ल्याने अमेरिकेला हादरवून दोन दशकांहुन जास्त काळ लोटला आहे. आजच्या दिवशीच 2001 साली घडलेल्या या घटनेला 22 वर्षे पूर्ण झाली.

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे सामाजिक राजकिय संदर्भ मोठ्या प्रमाणात बदलले. अमेरिकेत अचानक मोठ्या प्रमाणात मुस्लिमद्वेष सुरू झाला.

जगाला या घटनेनंतर दहशतवादाशी लढण्यासाठी एकत्र यावंच लागलं. जगभरातले प्रमुख देश या मुद्यावर बोलायला पुढे आले.

9/11 वर आधारित चित्रपट

ही एक शोकांतिका होती ज्याने अमेरिकेच्या देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणांवर आणि प्रतिमेवर एक दूरगामी परिणाम होता. या घटनेवर हॉलीवूडसह बॉलीवूडनेही भाष्य केलं, चला पाहुया ते चित्रपट ज्यातून या भयंकर घटनेवर भाष्य केलं आहे.

1. 9/11: इनसाईड द प्रेसिडेंट्स वॉर रूम

जेफ डॅनियल्स यांनी नॅरेट केलेला 9/11: इनसाईड द प्रेसिडेंट्स वॉर रूम हा माहितीपट या हल्ल्याची दाहकता सांगतो.

या हल्ल्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि व्हाईट हाऊस यांच्यासमोर असणाऱ्या आव्हानांमुळे हृदयाची धडधड वाढवणाऱ्या हल्ल्यांनंतरच्या त्या 12 तासांची गोष्ट सांगतो. प्रेसिडेंट हाऊसमधल्या चर्चा आणि निर्णयांवर भाष्य करणारे कथानक एकदा नक्कीच पाहा

 टर्निंग पॉइंट: 9/11 अँड द वॉर ऑन टेरर

पाच भागांची, ही डॉक्यूमेंटरी सिरीज 9/11 नंतरच्या जगावर प्रकाश टाकते आणि या हल्ल्यांची कारणे आणि परिणाम यांवर ही कलाकृती भाष्य करते.

इतक्या मोठ्या आपत्तीच्या घटनेला रोखण्यात अपयशी ठरलेल्या इंटेलिजन्स प्रोटोकॉलमधील त्रुटींवर ही सिरीज प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

अनेक नागरीक, अमेरिकन अधिकारी, दिग्गज आणि हल्ल्यात वाचलेल्या लोकांपासून ते तालिबान कमांडर, अफगाण कमांडर यांच्याही मुलाखती या सिरीजमध्ये तुम्ही पाहू शकता.

3. वर्थ (2020)

9/11 च्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एका मोठ्या वकिलासमोर एक आव्हान आहे जेव्हा त्याला पीडितांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक नुकसान भरपाईची वाटाघाटी करण्यासाठी नियुक्त केले जाते.

मानवी स्वभावाचे, मुल्यांची मांडणी करणारे अनेक मुद्दे तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतील.  हा चित्रपट खऱ्या घटनांपासून प्रेरित आहे आणि मायकेल कीटन, स्टॅनले टुसी आणि एमी रायन या कलाकारांच्या भूमिका आहेत.

4. द रिपोर्ट

अॅडम ड्रायव्हर अमेरिकन सिनेट इंटेलिजन्स कमिटीच्या डॅनियल जे. जोन्सच्या रूपात या पॉलिटिकल थ्रिलरची गोष्ट सांगतो. ज्यांना 9/11 नंतर स्थापन झालेल्या CIA चे अटकसत्र आणि चौकशी करण्याचे काम दिले जाते.

जेव्हा तो प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा त्याला भ्रष्टाचार, फसवणूक आणि नष्ट झालेले पुरावे हे धक्कादायक मुद्दे छळायला लागतात. त्याला कित्येक धक्कादायक गोष्टी समजतात आणि तो हादरुन जातो. हा चित्रपट एका रिपोर्टवर आधारित आहे.

5. झिरो डार्क थर्टी (2012)

ऑपरेशन नेपच्यून स्पियरला या थ्रिलरमध्ये एक नाट्यमय सिनेमॅटिक प्रेझेंटेशन तुम्हाला बघायला मिळू शकते. अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनचा दशकभर चाललेल्या शोध आणि अखेरच्या खात्माचा इतिहास आहे तुम्हाला एक थरारक अनुभव देतो.

 कथा सीआयए अॅनिलिटिक्स माया हॅरिस (जेसिका चॅस्टेन) च्या दृष्टीकोनाची मांडणी करते. नायिकेचे 9/11 नंतर पाकिस्तानमधील यूएस दूतावासात पुन्हा नियुक्ती केली जाते.

 तिच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांमुळे अखेरीस अधिकाऱ्यांना बिन लादेनचे अबोटाबाद, पाकिस्तानमधील ठिकाण शोधण्यात आणि त्याला मृत किंवा जिवंत पकडण्यासाठी लष्करी छापा टाकण्यात मदत झाली.

6. माय नेम इज खान

9/11 नंतर अमेरिकन मुस्लिमांनी अनुभवलेल्या भेदभावावर प्रकाश टाकणारी, माय नेम इज खान ही एका निष्पाप माणसाच्या त्याच्या हिंदू पत्नीशी पुन्हा एकत्र येण्याच्या प्रयत्नांची हृदयद्रावक कथा आहे.

 रिजवान खानच्या ( शाहरुख खान ) सावत्र मुलाचा हल्ल्यांमुळे झालेल्या वांशिक हिंसाचारात मृत्यू झाल्यानंतर, त्याची पत्नी मंदिरा ( काजोल ) त्याच्या आडनावाला जबाबदार धरते. 

रागाच्या भरात, ती त्याला राष्ट्रपतींना हे पटवून देण्यास सांगते की तो दहशतवादी नाही. रिजवान खान अर्थात शाहरुखने या चित्रपटात केलेली भूमीका अक्षरश: तुम्हाला वेडावून टाकते.. मंदिराला मिळवण्यासाठी देशाच्या राष्ट्रपतींना भेटण्यासाठी त्यांचा संपूर्ण अमेरिका प्रवास हा चित्रपट दाखवतो.

न्यूयॉर्क

हा चित्रपट ओमर एजाज (नील नितीन मुकेश) ची गोष्ट सांगतो, ज्याला 2009 मध्ये एफबीआयने ताब्यात घेतले आणि त्याचा कॉलेज फ्रेंड, समीर शेख (जॉन अब्राहम) याची हेरगिरी करण्यास भाग पाडतो. 

अधिकारी त्याला दहशतवादी मानतात परंतु त्यांच्या संशयाची पुष्टी करण्यासाठी कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नसतात. ओमर सहमत आहे आणि समीर आणि त्याची पत्नी माया ( कतरिना कैफ ) सोबतची मैत्रीबाबत भावनिक होतो आणि हे आरोप खोटे सिद्ध करण्याचा निर्धार करतो.

वर्ल्ड ट्रेड सेंटर

हा निकोलस केज आणि मायकेल पेना यांच्या मुख्य भूमीका असणारा चित्रपट पोर्ट अथॉरिटी पोलिसांभोवती फिरतो जे हल्ल्यानंतक वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दक्षिण टॉवर कोसळला तेव्हा ढिगाऱ्याखाली अडकले. 

दोन माणसे लिफ्टच्या शाफ्टमध्ये चढतात आणि हल्ल्यानंतक परिस्थिती नियंत्रणत येण्याच आणि त्यानंतर बचाव होण्याची वाट पाहतात. अधिकाऱ्यांनी ते जिवंत असल्याची पुष्टी केली आहे, परंतु त्यांची सुटका होण्यासाठी काही तास लागतात.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT