Actress Jacqueline Fernandez Dainik Gomantak
मनोरंजन

Money Laundering Case: जॅकलिनच्या चौकशीला सुरूवात, EOWची प्रश्नांची यादी तयार

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस लाँडरिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा (EOW) कार्यालयात पोहोचली

दैनिक गोमन्तक

Jacqueline Fernandez Summoned in Money laundering case: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा (EOW) कार्यालयात पोहोचली आहे. येथे अधिकारी अभिनेत्रीची किती तास चौकशी करणार हे नेमकं सांगता येणार नाही, परंतू ही चौकशी अनेक तास चालण्याची शक्यता आहे.

खरं तर, EOW ने आज बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला तपासात सहभागी होण्यासाठी बोलावले आहे. तिला याआधी सोमवारी हजर राहण्यास सांगितले होते परंतु काही कारणांमुळे ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. रिपोर्टनुसार, जॅकलिन फर्नांडिसने सोमवारी मिळालेल्या समन्सवर दिल्ली पोलिसांना एक ईमेल लिहिला होता, ज्यामध्ये तिने सोमवारी चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. पोलिसांनी जॅकलिनची विनंती मान्य केली होती. यानंतर तिला पुन्हा नवीन समन्स बजावण्यात आले होते. यापूर्वी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात EOW ने या प्रकरणात आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची साक्ष नोंदवण्यात आली होती.

सुकेशने अनेक उच्चभ्रू लोकांची फसवणूक केली

फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांच्यासह काही उच्चभ्रू लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी चंद्रशेखरला अटक करण्यात आली होती. चंद्रशेखरशी संबंध असल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाने बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि मॉडेल्सची चौकशी केली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, चंद्रशेखरला 2017 च्या निवडणूक आयोगाच्या लाचखोरी प्रकरणाशी संबंधित आणखी एका मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती, ज्यात AIADMK च्या माजी नेत्याचा समावेश होता.

जॅकलिनची दोन दिवस चौकशी होण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला पाठवलेल्या समन्समध्ये तिची दीर्घ चौकशी होऊ शकते. ही चौकशी दोन दिवस चालु शकते. म्हणूनच जॅरलिनला दिल्लीत राहण्याची तयारी करूनच या असे सांगण्यात आले आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेशसोबत जॅकलिनचे नावही समाविष्ट केले आहे. दुसरीकडे, जॅकलिनच्या चौकशीबाबत बोलताना पोलिसांनी प्रश्नांची एक लांबलचक यादी तयार केल्याचे सांगितले जात आहे. सर्वप्रथम, पोलिस जॅकलीनला तिच्या सुकेशसोबतच्या संबंधांबद्दल विचारू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT