Actress Jacqueline Fernandez
Actress Jacqueline Fernandez Dainik Gomantak
मनोरंजन

Jacqueline Fernandez Bail: जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा, अटकेपुर्वीच जामीन मंजुर

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. तिला पटियाला हाऊस कोर्टातून 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे.

अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तिची 15 तास चौकशी केली. ईडीच्या चौकशीनंतर सुकेश आणि जॅकलीनचे घट्ट नाते असल्याचा दावा बळकट झाला, त्यानंतर पटियाला कोर्टालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला आणि जॅकलिनला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले. त्यानंतर आज जॅकलिन कोर्टात हजर झाली.

17 ऑगस्ट रोजी ईडीने (ED) आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये जॅकलीनला 200 कोटींच्या वसुली प्रकरणातही आरोपी आढळले होते. त्यानंतर जॅकलिनच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, आता जॅकलिनला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. तिला जामीन मिळाला आहे.

जॅकलिन फर्नांडिसची ड्रेस डिझायनर लिपाक्षीची 21 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेने सात तास चौकशी केली. ज्यामध्ये लिपाक्षीने सुकेश आणि जॅकलिनबद्दल अनेक खुलासे केले होते. सुकेशने जॅकलिनला कपडे आणि भेटवस्तू देण्यासाठी तिला तीन कोटी रुपये दिल्याची कबुली त्याने दिली आहे. चंद्रशेखरच्या अटकेच्या वृत्तानंतर जॅकलीन फर्नांडिसने त्याच्याशी संबंध तोडले, असेही लिपक्षी इलावाडीने सांगितले.

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. काही काळापूर्वी जॅकलिनशिवाय नोरा फतेहीचीही चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात जॅकलिन आणि नोराशिवाय अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT