Mithun's Mother Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Mithun's Mother Passes Away : अभिनेते मिथुन चक्रवर्तींच्या आईचे निधन, काही काळापूर्वी वडिलांना गमावलं होतं

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आईचं निधन झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे.

Rahul sadolikar

Mithun Chakraborty Mother Passes Away : नुकतीच मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी आली आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिथुनची आई शांतीराणी चक्रवर्ती या जगात नाहीत. शुक्रवारी त्यांचे निधन झाले.

मिथुनचा धाकटा मुलगा नमाशी याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तीन वर्षांपूर्वी अभिनेत्याचे वडील बन्सत कुमार चक्रवर्ती यांनी या जगाचा निरोप घेतला होता. आता अभिनेत्याच्या डोक्यावरून आईची सावलीही हरवली आहे.

वडिलांचेही झाले होते निधन

कोविड दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांचे वडील बसंत कुमार चक्रवर्ती यांचे 21 एप्रिल 2020 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झाले. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते मिथुनने आपल्या आईलाही गमावले.

कोलकात्यात होते वास्तव्याला

मिथुन चक्रवर्ती एकेकाळी कोलकात्यातील जोराबागन भागात आई-वडील आणि चार भावंडांसोबत राहत होते, पण जेव्हा मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनयाच्या जगात नाव कमावले तेव्हा तो आपल्या आई-वडिलांना घेऊन गेला.

जेव्हा मिथुन चक्रवर्ती मुंबईत राहू लागला तेव्हा त्याने आपल्या आई - बाबांना सोबत ठेवले. तेव्हापासून त्यांची आई शांतिराणी चक्रवर्ती मुंबईतच राहत होती. मिथुन चक्रवर्ती यांच्या आईच्या निधनाबद्दल बंगाल भाजपच्या वतीने शोक व्यक्त करण्यात आला आहे.

बंगाल भाजपने जारी केले निवेदन

बंगाल भाजपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आईचे निधन झाले आहे, आम्ही दु:खी आहोत, हादरलो आहोत. या कठीण परिस्थितीत भाजप परिवारातील प्रत्येक सदस्य त्यांच्या पाठीशी उभा आहे.

टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी मिथुन चक्रवर्तीच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्यातील राजकीय मतभेद असूनही, कुणाल घोष यांनी राजकीय कटुता मागे ठेवून अभिनेत्याच्या कठीण काळात शोक व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT