Mithun Chakrabotry Dainik Gomantak
मनोरंजन

Dadasaheb Phalke Award: क्या बात,क्या बात,क्या बात!!! मिथुन चक्रवर्तींच्या नावे दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Mithun Chakrabotry award: मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Dadasaheb Phalke Award 2024

हिंदी सिनेसृष्टीतील एक दिग्गज कलाकार म्हणजेच मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना सदर माहिती दिली.

श्री अश्विनी वैष्णव ट्विटरच्या माध्यमातून सर्वांसमोर ही माहिती पोहोचवताना लिहितात की, "मिथुन चक्रवर्ती यांची सिनेमातील कारकीर्द प्रत्येक पिढीला प्रेरणा देत आली आहे. हिंदी सिनेमा सृष्टीतील अशा एका महान कलाकाराच्या नावे जाहीर झालेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल माहिती देताना मला अत्यंत अभिमान वाटतोय".

मिथुनदांना कधी मिळणार पुरस्कार?

मिथुन चक्रवर्ती यांना 8 ऑक्टोबर 2024 रोजी 70व्या नेशनल फिल्म एवोर्ड सेरेमनीमध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी वर्ष 1977 मध्ये 'मृग्या' नावाच्या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

आत्तापर्यंत मिथुन चक्रवर्ती यांनी हिंदी, तामिळ, तेलगू, पंजाबी आणि बंगाली अशा विविध भाषांमध्ये जवळपास 350 पेक्षा अधिक चित्रपट केले आहे. तसेच मिथुन चक्रवर्ती यांना यापूर्वी पद्मभूषण या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT