Mithun Chakraborty Dainik Gomantak
मनोरंजन

Mithun Chakraborty: मिथून चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत हॉस्पिटलने केले निवेदन जारी!

Mithun Chakraborty: यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Mithun Chakraborty: बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता मिथून चक्रवर्ती या आपल्या आरोग्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याला ब्रेन स्ट्रोक झाल्याचे म्हटले गेले आहे. आता आता रुग्णालयाने मिथून चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबाबत एक निवेदन जारी केले असून ते अजूनही रुग्णालयात असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिथुन चक्रवर्ती यांची सध्या प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलने निवेदनात सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्तीच्या जवळच्या सूत्रांनी माहिती दिली होती की अभिनेता अस्वस्थ वाटत होता आणि त्याने छातीत दुखत असल्याचे सांगितले होते. यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा हिने छातीत दुखत असल्याची माहिती चूकीची असून ते नुकतेच नियमित तपासणीसाठी गेले होते आणि ते पूर्णपणे ठीक असल्याचे म्हटले होते.

डॉक्टरांनी सांगितले की मिथुन चक्रवर्ती यांना मेंदूशी संबंधित इस्केमिक सेरेब्रोव्हस्कुलर स्ट्रोक झाला होता. मिथुन चक्रवर्ती आता पूर्णपणे जागरूक आहेत आणि चांगले काम करत आहेत. त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, मिथून चक्रवर्तींच्या आरोग्यासंबंधीची माहिती समजल्यानंतर चाहते मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करताना दिसत असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT