Miss Shetty Mr Polishetty Movie on OTT: 7 सप्टेंबरला शाहरुख खानचा जवान रिलीज झाला. चित्रपटाने जगभरात 1 हजार कोटींची कमाई केली. या चित्रपटाने हिंदी चित्रपटातल्या आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
जवानसोबतच रिलीज झालेला साऊथचा एक चित्रपट जवानच्या तगड्या चित्रपटाला टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तग धरुन आहे. चला पाहुया अनुष्का शेट्टीच्या या चित्रपटाबद्दल.
हा चित्रपट जवानसोबतच रिलीज झाला. अनुष्का शेट्टी आणि 'छिछोरे' फेम नवीन पॉलिशेट्टी अभिनीत रोमँटिक कॉमेडी चित्रपटाची गोष्ट तशी साधी आणि रंजक आहे.
महेश बाबू पचिगोला दिग्दर्शित लंडनमध्ये राहणाऱ्या एका तरुणाच्या कथानकाभोवती केंद्रित आहे, ज्याला कायमचे अविवाहित राहायचे आहे, तर भारतातील तेलंगणामधील हैदराबादमधील तरुणीला प्रेमात पडायचं आहे, शिवाय तिला रिलेशनशीपमध्ये राहण्याची इच्छा आहे.
दोघं आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असल्याचं दिसतं आणि मग चित्रपटाचा प्रवास सुरु होतो.
हा चित्रपट Netflix वर प्रदर्शित झाला आहे आणि तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये स्ट्रीमिंग झाला आहे.
मिस शेट्टी आणि मिस्टर पॉलिशेट्टी हा अनुष्का शेट्टीचा 2020 मध्ये निशब्धम नंतरचा चित्रपट आहे . ती मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्यानंतर जवळपास 3 वर्षांनंतर तिचा अभिनय पाहून तिचे चाहते आनंदित झाले.
हा चित्रपट स्त्रीवादी विचारसरणीवर आधारित थीमवर केंद्रित आहे, मिस शेट्टीची भूमिका अनुष्काने केली आहे जिला लग्न कमीटमेंटमध्ये रस नाही. तर मिस्टर पॉलीशेट्टीची भूमीका छिछोरे' फेम नवीन पॉलिशेट्टीने केली आहे. दोघे एका वळणावर एकमेकांना भेटतात.
अभिनेत्री अनुष्का शेट्टी नेहमीच उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते, मग ती संपूर्ण व्यावसायिक मनोरंजनासाठी असो किंवा कथानकावर आधारित चित्रपट असो, ती पाहण्यासारखी कामगिरी असेल.
शिवाय, या चित्रपटात अनुष्का आणि नवीन या दोघांनीही त्यांच्या अभिनयाची प्रेक्षकांकडून वाहवा झाली आहे.