कमांडो, खुदा हाफिज यांसारख्या चित्रपटातून सुपर ॲक्शन सीन्सने चाहत्यांना वेड लावणारा अभिनेता विद्युत जमवाल लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
काहीच दिवसांपूर्वी परिणीती चोप्राने राघव चढ्ढा सोबत लग्न केलं. आता परिणीतीनंतर विद्युत जामवाल लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातंय.
राघव त्याची गर्लफ्रेंड नंदिता महतानीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये सप्टेंबरमध्ये विद्युतने डिझायनर नंदिता महतानीसोबत साखरपुडा केला होता.
अमर उजालाच्या बातमीनुसार, आता विद्युत आणि नंदिता यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची बातमी मिळाल्याने सर्वांना सुखद धक्का बसलाय. विद्युत आणि नंदिता या दोघांनी बरेच दिवस त्यांचे नाते गुप्त ठेवले होते. आता लवकरच या जोडप्याच्या लग्नाची घंटा वाजू शकते, अशा बातम्या जोर धरु लागल्या होत्या. दोघांच्या लग्नासंबंधी एक मोठे अपडेट समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत आणि नंदिता यांनी लंडनमध्ये गुपचुप लग्न उरकल्याची शक्यता आहे. दोघांनीही आपल्या जवळचे मित्र आणि कुटुंबीयांना ही बातमी गुप्त ठेवायला सांगितली आहे.
विद्युतने लग्नाची ही गोष्ट अत्यंत खाजगी ठेवली आहे. जर हे खरे असेल, तर हे दोघे लवकरच त्यांच्या लग्नाची जाहीर घोषणा करण्याची सर्व वाट पाहत आहेत. काही दिवसांपुर्वी दोघांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. पण आता दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्याने त्यांच्या फॅन्सना आनंद झालाय.