Mirzapur 3 movie is coming soon  Dainik Gomantak
मनोरंजन

खुशखबर! लवकरच येणार 'Mirzapur 3', गुड्डू अन् कालीन भैयाचा जोरदार अ‍ॅक्शन

लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझन येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'च्या (Mirzapur) तिसऱ्या सीझन येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिर्झापूर सीझन 3 चे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरू होणार असल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. मालिकेचा तिसरा सीझन आधीच्या कहाणीपेक्षा आणखी दमदार असणार आहे. या सीझनमध्येही कालिन भैय्या आणि गुड्डू भैया यांच्यातील नाते उघड होणार आहे. 'मिर्झापूर 3'मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल आणि श्वेता त्रिपाठी मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत. या मालिकेच्या स्थानिक ऑडिशन्स उत्तर प्रदेशातील शहरांमध्येच पूर्ण झाल्या आहेत. (Mirzapur 3 movie is coming soon for fans)

शनिवारी लखनौमध्ये मिर्झापूर 3 च्या स्थानिक कलाकारांच्या ऑडिशन्स पूर्ण झाल्या आहेत. ऑगस्टच्या अखेरीस लखनऊमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे तसेच मिर्झापूर 3 च्या ऑडिशन्स 15 आणि 16 जुलै रोजी गोमतीनगरमध्ये घेण्यात आल्या आहेत.

अली फजल आणि श्वेता त्रिपाठी यांच्या सीनचे चित्रीकरण लखनौमध्ये पुर्ण होणार आहे. यासाठी जुन्या लखनौमधील चौक, इमामबारा, रूमी दरवाजा, काकोरी, मलिहाबादसह आसपासची ठिकाणे ठरवण्यात आली आहेत. वेब सिरीजचे शेड्युल जवळपास एक महिन्याचे असून, त्यामध्ये स्थानिक कलाकारांची निवड करण्यात आली आहे.

मिर्झापूर 3 चे लोकल लाइन प्रोड्युसर रती शंकर त्रिपाठी आहेत, 'मिर्झापूर 2' चा काही भाग लखनऊमध्ये शूट करण्यात आला होता आणि 'मिर्झापूर 3'चे शूटिंग सुरू झाले आहे. अलीकडेच अभिनेत्री रसिका दुग्गलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिसऱ्या सीझनचे शूटिंग सुरू करण्याबाबतची माहिती दिली आहे.

यावेळी अली फजलचे जबरदस्त परिवर्तन या मालिकेत पाहायला मिळणार आहे आणि अली दमदार अॅक्शन मोडमध्ये दिसून येणार आहे. त्याच्या भूमिकेसाठी तो कुस्ती देखील शिकत आहे. 'मिर्झापूर 3'च्या तिसऱ्या सीझनमध्ये चाहत्यांना भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT