Milind Soman dainik gomantak
मनोरंजन

lock upp: कंगनाच्या तुरुंगात मिलिंद सोमणची वाईल्ड कार्ड एंट्री

lock upp: कंगनाच्या तुरुंगात मिलिंद सोमण एंट्री Milind Soman Wild Card Entry Kangana Ranaut lock Upp Celebrity custody Instagram Wild Milind Soman

दैनिक गोमन्तक

lock upp: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा नवीन शो 'लॉकअप' सध्या चर्चेत आहे. या शोच्या भन्नाट थीममुळे तो दर्शकांच्या पसंतीला उतरत आहे. तर नेहमी वादात असणाऱ्या अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये दिसणार आहेत. विशेष म्हणजे सेलिब्रिटी हे कैदी असतील तर अभिनेता करण कुंद्रा हा जेलर आहे. त्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यात तो जास्तच कडक असल्याचे दिसत आहे. आता या शोमध्ये एक नवा चेहरा दिसणार असून त्याला वाइल्ड कार्ड एंट्री मिळणार आहे. त्यामुळे lock upp मधील इतर कैदी 'तो' कोण अशा विचारात वावरत आहेत. तर हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या फिटनेसवरून नेहमीच चर्चेत राहणारा मिलिंद सोमण आहे. मिलिंद लवकरच कंगनाच्या तुरुंगात कैदी म्हणून दिसणार आहे. मात्र या वाईल्ड कार्ड एंट्री बाबत अद्याप शोच्या निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. (Milind Soman's wild card entry in Kangana lock upp)

lock upp हा शो बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत होस्ट करणार असून 16 वादग्रस्त सेलिब्रिटी (Celebrity) यात भाग घेणार आहेत. तर अनेक महिन्यांसाठी तुरुंगवास (custody) भोगाणार आहेत. आता कैद्यांच्या यादीत मिलिंद याचे नाव ही येणार असून त्याची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे.

याबाबत विरल भयानी यांनी स्पष्टता देताना मिलिंदचा एक फोटो इंस्टाग्राम (Instagram) हँडलवर पोस्ट केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'बदमाश जेल लवकरच "वाइल्ड" (Wild) होणार, आम्ही शोमध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातून नवीन कैद्याला भेटू. त्यामुळेच ही एंट्री मिलिंद सोमणची (Milind Soman) असल्याचं बोललं जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT