Mark Antony Dainik
मनोरंजन

Mark Antony Ott Release Date: बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातलेला मार्क अँटनी लवकरच ओटीटीवर येणार

Mark Antony Ott Release Date: 'मार्क अँटनी' हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे ज्यामध्ये विशाल दुहेरी भूमिकेत दिसला होता.

दैनिक गोमन्तक

Mark Antony Ott Release Date: तमिळ अभिनेता विशाल गेल्या अनेक दिवसांपासून सेन्सॉर बोर्डावर लावलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. त्याच्या नुकत्याच आलेल्या 'मार्क अँटनी' या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन पास करून घेण्यासाठी साडेसहा लाख रुपयांची लाच द्यावी लागल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

'मार्क अँटोनी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 100 कोटी क्लबमध्ये सामील होणाऱ्या चित्रपटामध्ये या चित्रपटाचादेखील समावेश झाला आहे. आता या ब्लॉकबस्टर सिनेमा ओटीटीवरदेखील रिलीज होणार आहे.

आता याची डेट समोर आली असून ज्या प्रेक्षकांना हा सिनेमा चित्रपटगृहात पाहता येणार नाही त्यांना आता घरी बसून या सिनेमाचा आनंद घेऊ येईल. चला तर जाणून घेऊयात 'मार्क अँटोनी' हा तमिळ चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलिज होणार आहे.

कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलिज होणार हा चित्रपट

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर अभिनेता( Actor ) विशालचा 'मार्क अँटोनी' प्रदर्शित होणार आहे. थिएटरनंतर, तो 13 ऑक्टोबर 2023 रोजी OTT वर प्रदर्शित होईल. OTT वर हा चित्रपट पाहण्यासाठी दर्शकांना Amazon Prime चे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतरच, ते चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.

'मार्क अँटनी' हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे ज्यामध्ये विशाल दुहेरी भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने तीन आठवड्यांत देशात 71.58 कोटी रुपये आणि जगभरात 102 कोटी रुपये कमावले.

तमिळ अभिनेत्याच्या आरोपांवर बोर्डाने काय म्हटले?

'मार्क अँटनी'चे हिंदी व्हर्जन सेन्सॉर बोर्डाने पास करून घेण्यासाठी लाच दिल्याचा आरोप विशालने आरोप केला होता. या प्रकरणाची CBFC ते मंत्रालयापर्यंत बरीच चर्चा झाली. लाचखोरीच्या आरोपांवर, मंडळाने म्हटले होते की अभिनेत्याने ज्या कर्मचाऱ्यांना पैसे दिले होते ते मंडळाचे नसून तृतीय पक्षाचे होते. मध्यस्थांच्या पाशाखाली तो अडकला होता.

दरम्यान, विशाल कृष्णन, रितू वर्मा, सुनील आणि एसजे सूर्या स्टारर 'मार्क अँटोनी' या महिन्यात ओटीटी धवरडकणार आहे. या चित्रपटा( Movie )चे दिग्दर्शन अधिक रविचंद्रन यांनी केले होते. हा चित्रपट 15 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

SCROLL FOR NEXT