Gondhal Marathi Movie Oscar 2027 Official Entry Dainik Gomanak
मनोरंजन

Oscar 2027: 'श्वास', 'कोर्ट'नंतर आता 'गोंधळ'! 33 तगड्या चित्रपटांना पछाडत ऑस्करसाठी निवड; मिळाले तुफानी रेटिंग

Gondhal Marathi Movie Oscar 2027 Official Entry: ऑस्कर 2027च्या ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या नामांकित श्रेणीसाठी संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची भारताची अधिकृत प्रविष्टि म्हणून निवड करण्यात आली.

Manish Jadhav

Gondhal Marathi Movie Oscar 2027 Official Entry: मराठी चित्रपटसृष्टीच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, ऑस्कर 2027च्या ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या नामांकित श्रेणीसाठी संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची भारताची अधिकृत प्रविष्टि म्हणून निवड करण्यात आली. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी या ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा केली. देशभरातील विविध भाषांमधील तब्बल 33 तगड्या चित्रपटांना मागे टाकत 'गोंधळ'ने ही उत्तुंग कामगिरी केली, ज्यामुळे जागतिक चित्रपट पटलावर मराठी चित्रपटसृष्टीची मान पुन्हा एकदा उंचावली.

ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाची कथा एका नवविवाहित जोडप्याच्या गोंधळ या पारंपरिक धार्मिक विधीच्या एका रात्रीच्या प्रवासाभोवती फिरते. अनच्छेने झालेले लग्न सहन करणारी 'सुमन' ही स्त्री आणि तिने आपल्या प्रियकरासोबत आखलेली थरारक योजना, याभोवती चित्रपटाचे कथानक अतिशय रंजकतेने विणण्यात आले. निवड समितीचे अध्यक्ष पी. शेषाद्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'धुरंधर', 'बॉर्डर 2', 'हक' आणि 'इक्कीस' यांसारख्या बलाढ्य हिंदी व प्रादेशिक चित्रपटांमधून 'गोंधळ'ची निवड करणे आव्हानात्मक होते. मात्र भारतीय संस्कृती, मूल्ये आणि सशक्त कथा या निकषांवर हा चित्रपट अव्वल ठरला.

चित्रपटात (Movie) अभिनेत्री इशिता देशमुख हिने मुख्य भूमिका साकारली असून किशोर कदम, योगेश सोहानी, निशाद भोईर आणि अनुज प्रभु यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विशेष म्हणजे, दिग्गज संगीतकार इलैयाराजा यांनी या चित्रपटाला दिलेले संगीत कथेची नाट्यमयता अधिक गडद करते. यापूर्वी 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे वर्ल्ड प्रीमियर झाले होते, जिथे संतोष डावखर यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' म्हणून सिल्व्हर पीकॉक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मराठी सिनेमाच्या इतिहासात ऑस्करसाठी अधिकृत प्रविष्टि म्हणून निवडला जाणारा 'गोंधळ' हा चौथा चित्रपट ठरला. यापूर्वी 'श्वास' (2005), 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' (2009) आणि 'कोर्ट' (2015) या चित्रपटांनी ही गगनभरारी घेतली होती. आयएमडीबीवर (IMDb) 8.9 चे दमदार रेटिंग मिळवणाऱ्या या चित्रपटाकडून आता संपूर्ण देशाला ऑस्करच्या सुवर्णपदकाची मोठी आशा निर्माण झाली. 14 मार्च रोजी पार पडणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात हा चित्रपट काय कमाल दाखवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Economy: गोव्याच्या अर्थकारणाचे दिल्लीत 'मंथन'; महसूलवाढ आणि खर्च नियंत्रणावर भर, सरकारने घेतले 100 कोटींचे कर्ज

Spam Call New Rules: फेक आणि स्पॅम कॉल्सला बसणार चाप! ट्रायचा मोठा निर्णय; 'AI'च्या मदतीने स्पॅमर्सवर होणार कडक कारवाई

Horoscope 19 Saptember 2026: शनिवारचा महा-संयोग! बुधादित्य आणि भद्र राजयोगाने चमकणार 'या' राशींचे नशीब; बँक बॅलन्स अचानक वाढणार

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

SCROLL FOR NEXT