Bharat Ganeshpure Mother Died Dainik Gomantak
मनोरंजन

Bharat Ganeshpure Mother Died : प्रेक्षकांना खळखळून हसवणारा तो आज रडणार या अभिनेत्याला झाला मातृशोक

मराठी टेलिव्हिजन विश्वातल्या या विनोदी अभिनेत्याला मातृशोक झाला आहे.

Rahul sadolikar

Bharat Ganeshpure mother Died: मराठी मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी आली आहे. मराठीतल्या एका विनोदी कलाकाराला आज मात्र रडावं लागणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज विनोदी कलाकारांपैकी एक म्हणजे भारत गणेशपुरे. भारत गेली अनेक वर्षे 'झी' मराठी वरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

भारत गणेशपुरे यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज गुरुवार, 9 मार्च रोजी भारत गणेशपुरे यांच्या आईचे निधन झाले आहे.

भारत यांच्या आई श्रीमती मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे गणेशपुरे यांच्या अमरावती येथील घरी आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

भारत यांचे बंधु मनीष यांच्या राहत्या घरातून रहाटगाव स्मशानभूमीकरता संध्याकाळी ५ च्या सुमारास अंत्ययात्रा निघणार आहे.

आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या भारत गणेशपूरेंवर मात्र आज दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विनोदी शो बरोबरच त्यांनी अनेक चित्रपटांतून विनोदी तसेच गंभीर भूमीका केल्या आहेत.

सध्या एका खासगी टेलिव्हिजन चॅनेलवर चालत असलेल्या मराठी शो मध्ये त्यांच्या कामाचं चांगलंच कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT