Manisha Koirala Dainik Gomantak
मनोरंजन

Manisha Koirala : "माझा नवराच माझा शत्रू बनला होता"! काय घडलं होतं मनिषा कोईरालाच्या आयुष्यात?

अभिनेत्री मनिषा कोईरालाने आपल्या आयुष्याच्या एका नाजुक प्रसंगाची आठवण सांगितली आहे.

Rahul sadolikar

दिलसे, महाराजा, अग्नीसाक्षी, युगपुरूष यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री मनिषा कोईरालाला एका एकाकी आयुष्य जगावं लागतंय. कधीकाळी तिचंही लग्न झालं होतं पण दुर्दैवाने तिला निराशेलाच सामोरं जावं लागलं.

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मनीषा कोईराला हिने बऱ्याच काळानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. आज ही अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे. मनीषाच्या चित्रपटांना चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले, पण खऱ्या आयुष्यात मनीषाला नेहमीच एकटे राहावे लागले.

मनीषा कोईराला हिचा समावेश ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये होतो. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू भाषेतही चित्रपट केले आहेत. 

साऊथच्या बॉम्बे, इंडियन आणि मुधलवण यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतेच एका मुलाखतीत मनीषाने लग्नानंतर झालेल्या त्रासाबद्दल सांगितले.

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मनीषा कोईराला हिने बऱ्याच काळानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. आज ही अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे. मनीषाच्या चित्रपटांना चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले, पण खऱ्या आयुष्यात मनीषाला नेहमीच एकटे राहावे लागले. 

विशेष म्हणजे मनीषाने नेपाळमधील उद्योगपती सम्राट दहलसोबत लग्न केले, पण लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. आता बऱ्याच काळानंतर अभिनेत्रीने तिच्या लग्नाबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

नुकत्याच झालेल्या मुलाखतीत याविषयी बोलताना मनीषा म्हणाली की, तिची फेसबुकच्या माध्यमातून सम्राटशी भेट झाली. दोघांनी एकमेकांना भेटायला सुरुवात केली आणि मग लग्न करण्याचा विचारही केला. 

मनिषाने सांगितले की, लग्नाच्या सहा महिन्यांनंतर तिच्यामध्ये आणि सम्राटमध्ये वाद सुरू झाला. खूप प्रयत्न करूनही काही जमलं नाही म्हणून दोघांनी लग्नाच्या दोन वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.  

मनीषा पुढे म्हणाली, 'लग्नाबद्दल माझी अनेक स्वप्ने होती, जी कधीच पूर्ण झाली नाहीत. मात्र, यासाठी मी कोणाला दोष देत नाही, जो काही दोष होता तो फक्त माझाच होता. जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसाल तर वेगळे होणे हा शेवटचा पर्याय उरतो. 

लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच माझा नवरा माझा शत्रू झाला. पत्नी आणि स्त्रीसाठी यापेक्षा वाईट काय असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT