Mandira Bedi and Raj Kaushal Dainik Gomantak
मनोरंजन

मंदिरा बेदीने पतीच्या निधनानंतर फोटो केले शेअर

बॉलिवूडमधील (Bollywood) अभिनेत्री आणि अँकर मंदिरा बेदीचे (Mandira Bedi) पती राज कौशलचे (Raj Kaushal) गेल्या आठवड्यात बुधवारी निधन झाले.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील (Bollywood) अभिनेत्री आणि अँकर मंदिरा बेदीचे (Mandira Bedi) पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे गेल्या आठवड्यात बुधवारी निधन झाले. मंदिरा बेदीच्या अगदी जवळ असलेल्या इंडस्ट्रीच्या (Film industry) अनेक कलाकारांनी (celebrities) शनिवार व रविवार रोजी राज कौशल यांच्यासाठी प्रार्थना सभा आयोजित केली होती. पतीच्या निधनाने मंदिरा बेदी पूर्णपणे तुटली आहे. पती राज कौशल याची आठवण करून देत मंदिरा बेदीने आज सोमवारी तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.(Mandira Bedi shares pictures after Raj Kaushals death)

या फोटोंमध्ये मंदिरा आणि राज खूप आनंदी दिसत आहेत. हे फोटो पोस्ट करताना मंदिराला तिचा नवरा राजांसोबत घालवलेल्या सुंदर आणि संस्मरणीय क्षणांची आठवत आहे. या पोस्टमध्ये अशी एक गोष्ट होती, जे पाहून आपले डोळे ओलसर होऊ शकतात आणि हृदय तुटू शकते. हे फोटो शेअर करताना मंदिराने दिलेली कॅप्शन.'जरी मंदिराने कॅप्शनमध्ये काहीही लिहिले नाही, परंतु तिने कॅप्शनमध्ये तुटलेलं हृदय असा इमोजी टाकले आहे. या एका इमोजीने असे म्हटले आहे की जे मंदिरा शक्यतो लिहू शकत नाही.'

मंदिरा बेदीच्या या फोटोंवर तिचे जवळचे मित्र आणि चाहते आपल्या प्रतिक्रिया देत तिचे धाडस बांधत आहेत. डान्सर शक्ती मोहन, बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल, मिथिला पालकर, आदा शर्मा यासारख्या काही सेलिब्रिटींनी कमेंट्सच्या माध्यमातून मंदिराला खूप प्रेम पाठवलं. त्याचबरोबर मंदिराचे चाहते तिला मजबूत राहण्याची विनंती करत आहेत.

राज कौशल हे चित्रपटसृष्टीतले एक नामांकित नाव होते. त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यात हुमा कुरेशी, रोनित रॉय, आशिष चौधरी, अपूर्व अग्निहोत्री सारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. राज कौशल यांच्या पश्चात पत्नी मंदिरा आणि वीर व तारा ही दोन मुले आहेत. ती अजूनही तरूण आहेत.

त्याच वेळी अंत्यसंस्कारानंतर मंदिरा बेदी यांना बरेच ट्रोल केले गेले. या ट्रोलने म्हटले आहे की एक महिला असूनही ती आपल्या पतीच्या पार्थिवला कशी अग्नी देऊ शकते. पण प्रत्येक वेळेप्रमाणे मंदिरा बेदी यांना कोणाचीही पर्वा नव्हती आणि त्यांनी पितृसत्ताला जोरदार झटका दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Air Force Base Attack: विमानतळावर गोळीबार अन् स्फोटांचा आवाज! एअर बेसला दहशतवाद्यांनी बनवलं निशाणा; 20 ठार, 11 जणांना बेड्या VIDEO

Social Media Ban Goa: सोशल मीडिया वापरावर सरसकट बंदी अयोग्य! तवडकरांचे प्रतिपादन; अभ्यासावर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त

"कधी नारद, कधी चार्ली चॅप्लिन, कधी श्रीकृष्ण"! गोव्यातले बापलेक जपताहेत 800 वर्षांची परंपरा; भांड-बहुरूपी कला

Ind Vs NZ: '..मुद्दामून असे केले'! न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर सूर्याचे खळबळजनक वक्तव्य; अय्यरबाबत केले मोठे विधान

Stray Dogs: 'भटक्या कुत्र्यांमुळे पर्यटन घटले'! सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; निर्बीजीकरणच्या अपयशावरती चर्चा

SCROLL FOR NEXT