arora 2.jpg
arora 2.jpg 
मनोरंजन

Malaika Arora वर्कआउट करत देतेय फिटनेसच्या टिप्स; पाहा Video

दैनिक गोमंतक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या फिटनेसबाबत (fitness) खूप सजग आहे . मलायका तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते, स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, ती जड व्यायामांचे (Exercise) अनुसरण करते. दररोज तिच्या जिमचे व्हिडिओ सोशल मीडियावरील (social media) इंस्टाग्रामवर (Instagram) प्रचंड  व्हायरल होत असतात. फिटनेस आणि स्टाइलमुळे  मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते . अलीकडेच  मालयकाने जिममध्ये कठोर कसरत करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे.(Malaika Arora giving fitness tips)  

मलाइका अरोराने इन्स्टाग्राम अकाउंटवर हा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती  जिममध्ये वेगवेगळ्या वर्कआउट्स (Workout) करताना दिसत आहे. कधी ती ट्रेडमिलवर धावताना दिसली तर कधी डंबेल उचलताना दिसली. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर 'लेव्हल अप' हे इंग्रजी गाणे झळकत आहे. व्हिडिओमधील मालयकाचा उत्साह पाहण्यासारखा आहे. व्हिडिओसह मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे 'चालणे, धावणे, फिरणे, श्वास घेणे, स्ट्रेच करा . पण सुरुवात तर करा. आंतरराष्ट्रीय योग दिवस 4 दिवस बाकी आहे! तुम्ही लोकं काय करीत आहात?' तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला . व्हिडिओवर कमेंट करत चाहते 'मेम अर्जुनलाही शिकवा' असे म्हणत आहेत. मलायका अरोराचा हा व्हिडिओ अल्पावधीत 499 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

 मलायका अरोराला अखेर भारताच्या बेस्ट डान्सरमध्ये जज म्हणून पाहिले होते. यासह मलायका अरोरा तिच्या डान्स आणि वर्कआउट व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. तिचे हे व्हिडिओ चाहत्यांनी चांगलेच पसंत केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT