Sushant Singh Death Case Dainik Gomantak
मनोरंजन

Sushant Singh Death Case : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचे पुरावे सापडले? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धक्कादायक माहिती... .

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात नवे खुलासे केले आहेत.

Rahul sadolikar

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या बातमीने देशभरातल्या त्याच्या चाहत्यांसह अनेकांना धक्का बसला होता, सुशांतची आत्महत्या की हत्या यावरुनही बरेच रणकंदन माजले होते.

अनेक राजकीय नेत्यांनीही या प्रकरणावर मोठी विधानं केली होती. हे प्रकरण मिटले असं वाटत असतानाच आता पुन्हा या प्रकरणाने डोके वर काढले आहे.  कुटुंबापासून चाहत्यांपर्यंत असा दु:खाचा डोंगर कोसळला होता, सुशांतची उणीव आजही त्यांना जाणवते.

सुशांतचे अचानक जाणे फॅन्ससाठी धक्कादायक... 

सुशांतचे अचानक जाणे त्याच्या चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नव्हते. आतापर्यंतच्या तपासात अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे समोर आले आहे, मात्र त्याची हत्या झाल्याचे त्याच्या चाहत्यांना नेहमीच वाटत आले आहे. 

मात्र, या प्रकरणात अद्याप काहीही सिद्ध झालेले नाही. पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीने नवे प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्रकरण CBI कडे

सुशांतच्या मृत्यूचे हे प्रकरण इतके पेटले की योग्य तपासासाठी ते केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलेले नाही. 

आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी अनेक नवे खुलासे केले आहेत. या नव्या माहितीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुलाखतीत फडणविसांनी सांगितले की, 'पूर्वी उपलब्ध असलेली माहिती केवळ अफवांवर आधारित होती, त्यानंतर काही लोकांनी दावा केला की त्यांच्याकडे या प्रकरणात पुरेसे पुरावे आहेत. त्यानंतर या लोकांशी संपर्क साधून पुरावे पोलिसांकडे देण्यास सांगण्यात आले. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या पुराव्यांची विश्वासार्हता पडताळण्याचे काम सुरू असून अद्याप तपास सुरू असल्याचेही फडणवीस म्हणाले. खटल्याच्या निकालावर भाष्य करणे त्यांच्यासाठी खूप घाईचे आहे.

रिया चक्रवर्तीवर आरोप

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या वेळी तो रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि नंतर अभिनेत्रीवरही आरोप झाले होते. ड्रग्ज घेणे आणि खरेदी केल्याप्रकरणी रिया चक्रवर्तीला जवळपास महिनाभर तुरुंगवास भोगावा लागला होता. पण, न्यायालयाने नंतर मान्य केले की एनसीबीकडे या आरोपांसाठी पुरेसे पुरावे नाहीत. सुशांतच्या बहिणी आणि कुटुंबीय अजूनही न्यायासाठी याचना करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT