Gufi Paintal Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Gufi Paintal Passes Away : "महाभारतातले शकुनी मामा गेले"...ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन

महाभारत या अजरामर मालिकेत शकुनी मामा हे पात्र साकारणारे अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन झालं आहे.

Rahul sadolikar

बीआर चोप्रा यांच्या महाभारत (1980) या टीव्ही शोमध्ये शकुनी मामाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते गुफी पेंटल यांचे सोमवारी मुंबईत वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.

पेंटल यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही आमचे वडील गुफी पेंटल यांच्या दुःखद निधन झाले आहे. आज सकाळी त्यांचे शांततेत निधन झाले यावेळी त्यांचे सर्व नातेवाईक उपस्थित होते . गुफी पेंटल यांचा पुतण्या हितेन पेंटल यांनी इंडियन एक्प्रेसला यासंदर्भातली सविस्तर माहिती दिली. “आज सकाळी 9 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.

गुफी पेंटल बऱ्याच दिवसांपासुन आजारी होते

गुफी पेंटल हे बऱ्याच दिवसांपासून अस्वस्थ होते आणि त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना ३१ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.एक अभिनेता असण्यासोबतच, गुफी यांनी काही टीव्ही शो आणि श्री चैतन्य महाप्रभू नावाचा चित्रपट देखील दिग्दर्शित केला. 

बीआर फिल्म्ससोबत त्यांनी सहयोगी दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर आणि प्रोडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले. गुफी पेंटल अभिनेते लोकप्रिय कॉमेडियन पेंटलचे भाऊ होते. विनोदी अभिनेते पेंटल यांना आपण सत्ते पे सत्ता, रफू चक्कर, परिचय आणि इतर सारख्या चित्रपटांमध्ये पाहिले आहे.

गुफी पेंटल यांचे चित्रपट

गुफीच्या यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये दिल्लगी (1978), देस परदेस (1978), दावा (1997), आणि सम्राट अँड कंपनी (2014) या चित्रपटांचा समावेश आहे. 1994 मध्ये आलेल्या सुहाग या चित्रपटात त्यांनी अक्षय कुमारच्या मामाची भूमिका साकारली होती . 

महाभारत या लोकप्रिय मालिकेव्यतिरिक्त, त्यांनी भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप, मिसेस कौशिक की पांच बहुये, कर्मफल दाता शनी आणि कर्ण संगिनी यांसारख्या टीव्ही शोमध्ये देखील काम केले.

कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते

काही दिवसांपूर्वा गुफी पेंटल प्रसिद्ध कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते. कपिलने यावेळी लोकप्रिय महाभारत मालिकेच्या सर्व कलाकारांना आमंत्रित केले होते. महाभारत मालिकेत युधिष्ठिर, भीम, दुर्योधन यांची पात्रं साकारणारे कलाकारही उपस्थित होते.

या एपिसोडमध्ये गुफी पेंटल यांनी महाभारत मालिकेच्या आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या. जुन्या आठवणीत रमत ते खळखळून हसले आणि बरेच भावूकही झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT