Viral Video| devdas Dainik Gomantak
मनोरंजन

Viral Video: देवदासच्या पारो अन् चंद्रमुखीचा ‘वाका-वाका’ होतोय व्हायरल, एकदा पाहाच!

या व्हिडिओमध्ये माधुरी आणि ऐश्वर्या चक्क 'वाका वाका' गाण्यावर थिरकतांना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमुळे प्रक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. सोशल मीडियावर सध्या नवनवे व्हिडीओ व्हायरल होतात. पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित चक्क ‘वाका वाका’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ देवदास चित्रपटातील ‘डोला रे डोला’ या गाण्याचा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगला ट्रेंड होत आहे.

या व्हिडीओमध्ये ‘देवदास’ (Devdas) चित्रपटातील (Movie) ‘डोला रे डोला’ हे गाणं पाहायला मिळत आहे. गाण्याचा व्हिडीओ जरी देवदास चित्रपटातील असला, तरी गाणं मात्र प्रसिध्द गायिका शकिराचे ‘वाका-वाका’ ऐकू येत आहे. हा व्हिडीओ (Video) पाहून नेटकरी व्हिडीओ एडिटरचे कौतुक करत आहेत. एक दुसऱ्याच गाण्यावर भलत्याच गाण्याचा व्हिडीओ, त्याच्या डान्स स्टेप इतक्या परफेक्ट बसवल्यामुळे हा व्हिडीओ पाहण्यास आणखीनच मनोरंजक वाटत आहे.

माधुरी आणि ऐश्वर्याचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 93 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत. नेटकरी देखील या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काही त्यांच्या डान्स स्टेप्सचे कौतुक करत आहेत. तर, काही मात्र, हा व्हिडीओ पाहून देवदासला देखील चक्कर येईल असे बोलत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT