Madhubala Biopic  Dainik Gomantak
मनोरंजन

Madhubala Biopic मध्ये दिलीप कुमार अन् किशोर कुमार यांच्याशी संबंधित रहस्यं होतील का उघड ?

Madhubala Biopic latest News: मधुबालाच्या बायोपिकमध्ये त्यांचे वैयक्तिक आयुष्य म्हणजेच दिलीप कुमारसोबतचे अफेअर आणि किशोर कुमारसोबतचे रहस्यं उघड होणार का याचा खुलासा काले गेला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री मधुबाला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मधुबालाच्या बायोपिकवर जोरदार काम सुरू असुन या बायोपिकशी एक महत्वाचा खुलासा मधुर भूषण यांनी केला आहे. मधुरच्या (Madhubala) म्हणण्यानुसार त्यांचे वैयक्तिक आयुष्य म्हणजेच दिलाप कुमारसोबतचे अफेअर आणि किशोरसोबतचे नातं मधुबालाच्या बायोपिकमध्ये दाखवले जाणार नाही. (Madhubala Biopic Latest News)

मधुबालाचे लग्न किशोर कुमारसोबत (Kishore Kuma) झाले होते आणि असे म्हटले जाते, लग्नानंतर मधुबालाच्या आजारपणाच्या काळात किशोरने त्यांना पूर्णपणे एकटे सोडले होते. तर किशोर कुमारशी लग्न करण्यापूर्वी मधुबाला दीर्घकाळ अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्याशी नात्यात होत्या.

मधुर (Madhur) यांनी केलेल्या नुकत्याच खुलाशामध्ये मधूबालाच्या बायोपिकमध्ये दिलीप कुमार आणि किशोर कुमार यांच्याशी संबंधित घटनांचा उल्लेख केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मधुबालाची (Madhubala) कथा सांगताना, आम्हाला कोणाला दुखवायचे नव्हते, दिलीप कुमार आणि किशोर कुमार यांच्याशी मधुबालाचे नाते कसे होते याकडे आम्हाला जायचे नव्हते कारण शेवटी त्यांचेही कुटुंब, पत्नी आणि मुले आहेत.'

मधुर पुढे बोलतांना सांगतात की, 'प्रत्येक नात्यात चढ-उतार असतात, ज्याप्रमाणे आपल्या आई-वडिलांबद्दल कोणीही काही बोलू नये. आपल्याला वाटत असते, त्याचप्रमाणे दिलीप कुमार आणि किशोर कुमार यांच्या कुटुंबालाही असे कोणीही घडावे असे वाटत नाही. मधुबाला यांनी वयाच्या 36 व्या वर्षी हृदयविकाराशी (Heart) झुंज देत 1969 साली या जगाचा कायमचा निरोप घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT