Murali Raju Passes Away: देशभर होळीचा सण सुरू असताना बॉलिवूडच्या एका निर्मात्यावर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतीच बॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर येत आहे.
प्रसिद्ध निर्माते मधु मंटेना यांचे वडील मुरली राजू यांचे मंगळवारी हैदराबादमध्ये निधन झाले. ते 70 वर्षांचे होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता,
त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुरली राजू हे राम गोपाल वर्मा यांचे काका होते. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर आमिर खान आणि अल्लू अर्जुनसह अनेक प्रसिद्ध स्टार्स श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते.
मधु मंटेना हा राम गोपाल वर्माचा मेहुणा आहे, त्यामुळे मुरली राजू नात्यात त्याचे मामा लागतात होता. मुरली राजू यांनाही वयाशी संबंधित अनेक आजार होते.
त्यांच्या निधनानंतर आमिर खान, अल्लू अर्जुनसह अनेक स्टार्सने हैद्राबादला जाऊन श्रद्धांजली वाहिली.
मधु मंटेना एक भारतीय चित्रपट निर्माता आहे आणि हिंदी, तेलुगु, बंगाली चित्रपटांमध्ये निर्मिती आणि डिस्ट्रिब्युशनमध्ये सुद्धा काम करतात.
त्यांनी 'गजनी', '83', 'उडता पंजाब' आणि 'सुपर 30' सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र, त्यांचे वडील चित्रपटसृष्टीशी संबंधित नव्हते. वडिलांचं ऐन सणासुदीच्या काळात निधन झाल्याने मधु मंटेनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, मधु मंटेनाने डिझायनर मसाबा गुप्ता यांच्याशी लग्न केले, जी प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे.
मधू आणि मसाबा यांचे 2015 साली लग्न झाले आणि 2019 मध्ये दोघेही परस्पर संमतीने वेगळे झाले. मसाबाने त्याच वर्षी सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.