London Misal Dainik Gomantak
मनोरंजन

London Misal:अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर 'लंडन मिसळ' चं पोस्टर रिलीज

'लंडन मिसळ' (London Misal) या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण होणार आहे.

दैनिक गोमन्तक

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जालिंदर गंगाराम कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' (London Misal) या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. श्री.रवींद्रनाथ टागोर यांनी लिहीलेल्या एका नाटकावरून प्रेरित होऊन या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले असून या पोस्टरमध्ये एका मुलीने पुतळ्यामागे लपून त्या पुतळ्याला आपल्या हाताने मिशी लावलेली दिसत आहे. हा चेहरा नक्की कोणाचा आहे आणि याचा नेमका अर्थ काय, हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. लवकरच या चित्रपटाचे लंडनमध्ये शूटिंग सुरु होणार आहे. वर्षअखेरीस 'लंडन मिसळ' चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'लंडन मिसळ'बद्दल दिग्दर्शक जालिंदर गंगाराम कुंभार म्हणतात, ''यापूर्वी मी चित्रपट, मालिका केल्या आहेत आता बऱ्याच काळानंतर मी पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच सुभाष घई यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळत असल्याने ही माझ्यासाठी फार आनंदाची बाब आहे. या चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर मराठी प्रेक्षकांना आवडेल असा आशय देण्याचा पूर्ण प्रयत्न मी 'लंडन मिसळ' मध्ये केला आहे.'' जालिंदर यांनी या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) शेअर करून त्याला कॅप्शन दिलं आहे.

एबी इंटरनॅशनल प्रस्तुत व महाळसा एंटरटेनमेंट आणि 'लंडन मिसळ' लिमिटेड यांच्या सहकार्याने ‘लंडन मिसळ' या चित्रपटाची (Movie) निर्मिती अमित बसनेत, परी राणा, सुरेश गोविंदराय पै यांनी केली आहे. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा सनीस खाकुरेल यांनी सांभाळली असून वैशाली पाटील सहयोगी निर्माती म्हणून काम पाहिले आहे. मुक्ता आर्ट्स लिमिटेड या चित्रपटाचे प्रस्तुतीकरण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police Recruitment: उपनिरीक्षक पदांसाठीची अंतिम सीबीटी 25 रोजी, परीक्षेसाठी दोन्ही जिल्‍ह्यांतील केंद्रेही निश्‍चित

IND VS NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का; ऋषभ पंत अचानक बाहेर, ईशान किशनला मिळणार संधी?

'कुशावती'साठी 500 कोटी द्या! CM प्रमोद सावंतांचे केंद्राला साकडे, गोव्याच्या 3960 कोटींच्या विविध मागण्या

Horoscope: रविवारची प्रसन्नता आणि भाग्याची साथ! 'या' राशींना मिळणार सुखाची भेट, वाचा सविस्तर भविष्य

माणुसकीला काळिमा! छत्तीसगडमध्ये 19 वर्षीय तरुणीवर 5 जणांचा सामूहिक अत्याचार; पोलीस हेल्पलाइनचा ड्रायव्हरच निघाला नराधम

SCROLL FOR NEXT