Vicky Kaushal and Katrina Kaif Dainik Gomantak
मनोरंजन

विकी कॅटच्या लग्नविरोधात वकिलाने दाखल केली तक्रार, जाणून घ्या

बॉलिवूडमधील (Bollywood) विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील एका रॉयल हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील (Bollywood) विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील एका रॉयल हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. हे दोन्ही कलाकार कुटुंबासह राजस्थानला पोहोचले आहेत. हे लग्न 7 ते 9 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मात्र, स्थानिक वकिलाने विकी आणि कतरिनाच्या लग्नाबाबत तक्रार दाखल केली आहे अशी चर्चा सुरु आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. लग्नाच्या निमित्ताने एका मंदिरात जाण्याचा मार्ग अडवल्यामुळे हे प्रकरण घडले आहे. 6 ते 12 डिसेंबर या कालावधीत प्रशासनाने चौथ माता मंदिराचा मार्ग बंद केला असून त्यामुळे भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. सिक्स सेन्स फोर्टच्या व्यवस्थापक, कतरिना कैफ, विकी कौशल आणि जिल्हाधिकारी यांच्या विरोधात वकील नेत्रबिंद सिंग जदौन यांच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वृत्तसंस्था एएनआयने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, कबीर खान, निर्माता अमृतपाल सिंग वृंदा आणि दिग्दर्शक आनंद तिवारी यांच्यासह 120 पाहुणे लग्नाला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी उशिरा कतरिनाची आई सुसान टरकोट, बहिणी नताशा, इसाबेल कैफ, भाऊ सबाशियन लॉरेंट मिकेल, कतरिना आणि विकी कौशल जयपूरला पोहोचले. 7 तारखेपासून विवाह सोहळे सुरू होतील. रिपोर्ट्सनुसार, सलमानचा बॉडीगार्ड शेराची कंपनी लग्नात सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहे.

गेल्या शुक्रवारी जिल्हाधिकारी राजेंद्र किशन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीला एसपी राजेश सिंह, एडीएम सूरज सिंह नेगी, इव्हेंट कंपनीचे प्रतिनिधी आणि हॉटेल कर्मचारी उपस्थित होते, जिथे लग्नाचे विधी होणार आहेत. सवाई माधोपूरमधील गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेबाबत ही बैठक होती. लग्नासाठी मुंबईहून अनेक सेलिब्रिटी येण्याची अपेक्षा आहे, ज्यांची झलक पाहण्यासाठी स्थानिक लोक तिथे पोहोचू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT