नवी दिल्ली : भारतरत्न, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना गेल्या 15 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत बऱ्याच प्रकारच्या उलट - सुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत तर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या बातम्या सुरू आहेत. मात्र, डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत आता बरीच सुधारणा झाल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर आता लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रवक्त्याने चाहत्यांना फेक न्यूजकडे लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे.
डॉक्टरांनी म्हटले की, लता मंगेशकर यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा बरी आहे. लता मंगेशकर या न्युमोनिया आणि कोरोना व्हायरसशी झुंज देत आहेत. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर सतत लक्ष ठेवून असते. त्यांच्या वयामुळे खबरदारी म्हणून त्यांना पुढील काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.
प्रवक्त्याने दिली माहिती
नुकतेच, लता मंगेशकर यांच्या टीमच्या वतीने एक निवेदन जारी केले होते त्यात म्हटले होते की, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत अनेक खोट्या बातम्या तसेच बऱ्याच प्रकारच्या उलट - सुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत येत आहेत. चाहत्यांनी अशा अफवांवर लक्ष देऊ नये. त्याचवेळी त्यांच्या प्रवक्त्याने ट्विट द्वारे म्हटले आहे की, 'कृपया खोट्या बातम्यांना हवा देऊ नका. लता दीदी आयसीयूमध्ये आहेत. डॉ. प्रतीत समदानी आणि त्यांची लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहेत.
8 जानेवारी रोजी केले रुग्णालयात दाखल
8 जानेवारी रोजी 93 वर्षीय लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अनेक अफवा उडू लागल्या. लता मंगेशकर प्रकृती ठीक नाही, असे काही पोस्टमध्ये म्हटले होते. त्याच वेळी, काही लोक त्याच्या मृत्यूबद्दल सुध्दा बोलले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.