Lata Mangeshkar and OP Nayyar  Dainik Gomantak
मनोरंजन

प्रसिद्ध संगीतकाराने लता दीदींबद्दल भीष्म प्रतिज्ञा केली अन् देश एका अजरामर जोडीला मुकला...

बॉलिवूडच्या सर्वात महागड्या संगीतकाराने लता मंगेशकर यांच्यासोबत कधीही काम करणार नाही, अशी शपथ घेतली होती.

Priyanka Deshmukh

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आता आपल्यात नाहीत पण त्यांचा आवाज संगीत रसिकांच्या हृदयात कायमस्वरूपी घर करून राहणार आहे. लताजींनी त्यांच्या प्रसिद्धीच्या सुरुवातीच्या काळात जवळजवळ प्रत्येक संगीतकार आणि पार्श्वगायकांसोबत गाणी गायली. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबतची त्यांची जोडी खूप गाजली आणि त्यांनी मोहम्मद रफींसोबत (Mohammed Rafi) सर्वाधिक गाणी गायली. पण एक संगीतकार होता ज्यांच्यासोबत लताजींनी एकही गाणं गायलं नाही. लता मंगेशकर यांच्यासोबत गाण्यासाठी जे संगीतकार लताजी मागतील ती फी भरायला तयार असायचे, त्याच लता मंगेशकर यांच्यासोबत एका संगीतकाराने कधीही न गाण्याची शपथ घेतली होती. (Lata Mangeshkar and OP Nayyar controversy)

ते सुप्रसिद्ध संगीतकार (Indian film music composer) ओपी नय्यर (Omkar Prasad Nayyar) होते. 50 आणि 60 च्या दशकात आपल्या संगीताच्या जोरावर अनेक चित्रपट सुपरहिट करणारे ओ पी नय्यर स्वतःच्या अटींवर काम करण्यासाठी प्रसिद्ध होते. ते जे म्हणायचे ते पूर्ण करायचे. इतरांसाठी त्यांनी कधीच त्यांचे नियम अथवा तत्व बदलले नाही. संगीतकार ओ.पी.नय्यर हे त्या काळातील अत्यंत एकवचनी व्यक्तीमत्व होते. ते त्यांच्या आग्रहावर नेहमीच ठाम रहायचे. काहीही झाले तरी लता मंगेशकर यांना गाणे म्हणायला लावणार नाही, त्यांच्या या निर्णयावर ते अखेरच्या श्वासापर्यंत ठाम राहिले.

खरं तर 'आसमान' चित्रपटाचा हा मुद्दा आहे. तेव्हा संगीतकार लोकं लता मंगेशकर यांच्या मागे फिरायचे. त्यांची एक तारीख घ्यायला महिना-महिना थांबायचे. आसमानच्या संगीत दिग्दर्शनादरम्यान, ओपी नय्यर यांनी सह-अभिनेत्रीवर एक गाणे बनवून लताजींना तिचा आवाज देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लताजींना हा प्रस्ताव आवडला नाही. त्या काळातील त्या एक मोठ्या आणि प्रसिद्ध गायिका होत्या आणि त्यांना मुख्य अभिनेत्रीऐवजी सह-अभिनेत्रीसाठी गाणे गायला आवडले नाही. आणि म्हणूनच त्यामनी ओपी नय्यर यांचा प्रस्ताव नाकारला होता.

संगितकार ओपी नय्यर यांना लताजींचा हा नकार खूप टोचला आणि त्यांनी त्याचवेळी लता मंगेशकर यांच्यासोबत कोणतेही गाणे करणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे लता मंगेशकर आणि ओपी नय्यर यांचे कॉंम्बीनेशन संगीतरसिकांना कधीच ऐकायला मिळाले नाही. त्यावेळी लता मंगेशकरांच्या आवाजाला संगीतसंयोजन देणं म्हणजे प्रसिद्धीपथावर पोहचण्यासारखे होते. मात्र ओपी नय्यर यांनी त्याकाळी स्वत:ला चॅलेंज दिले आणि लता दिदींसोबत काम न करता प्रसिद्ध होवून दाखवणार असा शब्द स्वत:ला दिला. आणि खरोखर त्यानंतर ओ पी नय्यर हिंदी सिनेसृष्टितील एक प्रसिद्ध संगितकार म्हणून उदयास आले. आजही अनेक संगीतप्रेमीच्या ओठी ओपी नय्यर यांची गाणी एकायला मिळतात.

दरम्यान या घटनेनंतर ओपी नय्यर यांनी लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले यांच्यासोबत अनेक सुपरहिट गाणी केली. आशा भोसले यांच्यासाठी संगीतसंयोजन केले आणि त्यांची गाणी सुपरहिट ठरली. आजही अनेक संगितप्रेमी त्यांच्या या निर्णयाचे कौतुक तर केलेच त्यासोबत दुजोरा देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

Curlies Restaurant Sealed : मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

SCROLL FOR NEXT