kriti senon Dainik Gomantak
मनोरंजन

Kriti Senon: युएई सरकारकडून क्रितीचा सन्मान! स्पेशल यादीत बॉलीवूडच्या 'या' कलाकारांचादेखील समावेश

Kriti Senon: मी सुंदर संस्कृतीचा एक भाग बनण्यास उत्सुक असल्याचे कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Kriti Senon: बॉलीवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या चित्रपटामुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे कलाकार चर्चेचा भाग बनतात. आता बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कृती सेनन सध्या एका देशामुळे चर्चेत आहे.

UAE सरकारने क्रितीला गोल्डन व्हिसा दिला आहे. यासोबतच हा सन्मान मिळालेल्या बॉलिवूड स्टार्सच्या यादीत क्रितीच्या नावाचा समावेश झाला आहे. याआधीही अनेक बॉलीवूड स्टार्सना हा सन्मान देण्यात आला आहे.

ईसीएच डिजिटलचे सीईओ इक्बाल मार्कोनी यांच्याकडून क्रिती सॅननला हा गोल्डन व्हिसा मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. 'यूएईचा गोल्डन व्हिसा मिळणे हा सन्मान आहे. दुबईचे माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि मी सुंदर संस्कृतीचा एक भाग बनण्यास उत्सुक असल्याचे कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे.

UAE जगातील आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गुंतवणूरदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हा व्हिसा देते. हा गोल्डन व्हिसा तेथे दीर्घकालीन मुक्काम किंवा स्थायिक होण्याची परवानगी देतो.

क्रिती सेननच्या आधी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना युएई सरकारकडून गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. ह शाहरुख खान, संजय दत्त, सानिया मिर्झा, बोनी कपूर, वरुण धवन, मौनी रॉय, उर्वशी रौतेला, सुनील शेट्टी, नेहा कक्कर, रणवीर सिंग, कमल हसन, मोहनलाल, दुल्कर सलमान, फराह खान, सोनू सूद अमला पॉल या सेलेब्रिटींना हा व्हिसा देण्यात आला आहे.

क्रितीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तर क्रिती शाहिद कपूरसोबत 'तेरी बातों में उल्झा जिया' या चित्रपटात दिसणार आहे. क्रिती आणि शाहिदची ही 'लव्हस्टोरी' यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ९ फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. आता शाहिद आणि क्रितीच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळणार आणि हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT