Krushna Abhishek Dainik Gomantak
मनोरंजन

Krishna Abhishek: 'गोविंदामुळे माझ्या करिअरमध्ये...' कृष्णा अभिषेकचा मोठा खुलासा

Krishna Abhishek: तसेच त्यांच्या करिअरच्या प्रवासाबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Krushna Abhishek reveal that Govinda's impact on his carrier

नेहमीच चर्चेत असतात. आता कॉमेडी कलाकार कृष्णा अभिषेक आणि सुदेश या दोन कलाकारांनी भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी या दोघांनी त्यांच्या बॉंडिंगबाबत तसेच त्यांच्या करिअरच्या प्रवासाबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. जाणून घेऊयात कृष्णा अभिषेकने कोणते खुलासे केले आहेत.

कृष्णा अभिषेकने भारतीला दिलेल्या या मुलाखतीत म्हटले आहे की, मी गोविंदाचा भाचा असल्याचा सुरुवातीच्या काळात मला खूप फायदा झाला. मी केवळ पैशासाठी कॉमेडी सर्कस साइन केले. ते मला प्रति एपिसोड ₹ ३ लाख देत होते. त्यांनी मला खूप आदर दिला कारण मी गोविंदाचा भाचा होतो.

कृष्णाने पुढे भोजपुरी चित्रपटांमधील अभिनयाच्या प्रवासाबद्दल सांगितले आणि तो म्हणतो की- 'त्यावेळी मी भोजपुरी चित्रपट करत होतो. भोजपुरी चित्रपटात केलेल्या आपल्या कामाचा मला खूप अभिमान आहे. एका चित्रपटाची मला कथादेखील समजली नव्हती पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

दरम्यान, बॉलीवूडचा सुपरस्टार गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यामधले वाद सर्वश्रुत आहेत. सातत्याने त्यांच्यामधील कुरबुरी समोर येत असतात. याबरोबरच, 'द कपिल शर्मा शो' या कॉ़मेडी शो मधून तो घराघरात पोहचला होता. मात्र या शोदरम्यान, कपिल शर्मा आणि कृष्णा यांच्यातदेखील वाद झाल्याचे पाहायला मिळत होते. या सगळ्यानंतर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कृष्णा अभिषेक आणि कपिल शर्माची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये ही जोडी एकत्र दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर येणाऱ्या या शोमध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर पुन्हा एकत्र दिसणार आहेत, तर अर्चना पूरण सिंग, किकू शारदा, राजीव ठाकूर हे देखील या शोचा भाग असणार आहेत. याची झलक नुकतीच पाहायला मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT