Coffee with Karan 8th seoson Dainik Gomantak
मनोरंजन

Koffee With Karan: करणच्या शो मध्ये अनन्या करणार आदित्य रॉय कपूर बरोबरच्या नात्याबद्दल खुलासा

Koffee With Karan: यात करीना कपूर आणि आलिया भट्टपासून सारा अली खान आणि अनन्या पांडे सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Koffee With Karan: कॉफी विथ करण चा ८ वा सीझन चांगलाच चर्चेत आहे. जेव्हापासून या शोची घोषणा झाली आहे तेव्हापासून यावर्षी करणच्या शो मध्ये कोण येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. आता मात्र कलाकारांची नावे उघड झाली आहे.

शोच्या सुरुवातीलाच रणवीर आणि दीपीका करणबरोबर गप्पा मारताना दिसले होते. त्यावेळी आपल्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या ज्या आत्तापर्यंत चाहत्यांना माहीत नव्हत्या. या एपिसोडनंतर दीपीकाला नेटकऱ्यांनी ट्रोलदेखील केले होते.

शोच्या सुरुवातीच्या भागात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आणि त्यानंतर सनी देओल आणि बॉबी देओल दिसले होते. आणि आता शेवटी, पाहुण्यांची रांग उघड झाली आहे. या शोमध्ये कोण कोण येणार याची झलक समोर आली आहे. यात करीना कपूर आणि आलिया भट्टपासून सारा अली खान आणि अनन्या पांडे सहभागी होणार आहेत.

कॉफी विथ करण सीझन 8 चा नवीन टीझर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये पाहुणे सोफ्यावर बसलेले दिसतात. सारा अली खानसोबत अनन्या पांडे दिसणार आहे, तर चुलत बहिणी काजोल आणि राणी मुखर्जी एकत्र दिसणार आहेत. अजय देवगण आणि रोहित शेट्टी एकत्र येत आहेत. करीना कपूर खान तिची वहिनी आलिया भट्टसोबत शोमध्ये येणार असून हे सर्व पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

कॉफी विथ करण चा ८ वा सीझन चांगलाच मनोरंजन करणारा असल्याचे या टीझरमध्ये दिसून येत आहे. अनेक कलाकारांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दलही मोठा खुलासा होताना दिसणार आहे.

त्यामुळे प्रेक्षकांसाठी कॉफी विथ करण चा सीझन म्हणजे मनोरंजनाची पर्वणीच असल्याचे असे दिसून येत आहे. आता कलाकार या मंचावर काय मजा-मस्ती करणार, एकमेकांविषयी काय सांगणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे सोशल मिडियावर दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT