K.L Rahul Dainik Gomantak
मनोरंजन

केएल राहुल आणि अथिया शेट्टीची घाटी सुब्रह्मण्यम मंदिराला भेट... व्हिडीओ व्हायरल

भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Rahul sadolikar

K.L Rahul and Athia Shetty Visit Ghati Subramanya Temple : सध्या आशिया कपची जोरदार क्रेज सुरू आहे. आशिया खंडातले 6 देश एकमेकांशी भिडले असुन आशिया कपवर कोणता देश दावा करणार याची उत्सुकता जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांना लागुन राहिली आहे.

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर के.एल राहुल टीममधून बाहेर आहे. बीसीसीआयच्या मेडीकल टीमने त्याला सध्या फिटनेस सर्टिफिकेट दिलं असलं तरीही अजुन राहुलने कमबॅक केलेलं नाही. राहुल सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मिडीयावर चर्चेत आहे.

सुब्रमण्यम मंदिराला दिली भेट

के.एल राहुल पत्नी अथिया शेट्टीसोबत एका मंदिराला भेट देताना दिसला. घाटी सुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या भेटीदरम्यान अथिया शेट्टी आणि केएल राहुलने पारंपारिक पोशाखांमध्येच जाणे पसंत केले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राहुल आणि अथिया यांनी मंदिराला भेट देताना सेलिब्रिटीच्या आवेशात न जाता सामान्य नागरिकांप्रमाणेच जाणे पसंत केले. राहुल तो सर्वसामान्य लोकांच्याच गर्दीतुन बाहेर पडताना दिसला. यावेळी काही लोकांनी केएल राहुलला ओळखले आणि सेल्फी काढण्याचाही प्रयत्न केला.

सुब्रह्मण्यम मंदिर

अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया आणि जावई केएल राहुल नेहमीच चर्चेत असतात. कर्नाटकातल्या दोडाबल्लापूर इथल्या मंदिराच्या या भेटीदरम्यान राहुल आणि अथियाने घाटी सुब्रह्मण्यम मंदिरात विधीनुसार पूजा केली. 

राहुल आणि अथिया तो मंदिरातून बाहेर आला तेव्हा फार कमी लोक त्याला ओळखू शकले. ते सर्वसामान्यांप्रमाणेच मंदिरातून बाहेर पडले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकांची सेल्फीसाठी धावाधाव

या व्हिडिओमध्ये अथिया शेट्टी आणि केएल राहुल मंदिरातून बाहेर पडताना दिसत आहेत. केएल राहुल समोर आहे आणि अथिया मागे आहे. सुरुवातीला दोघांना कोणी ओळखत नाही, पण नंतर एक व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी त्यांच्याकडे धावतो. यानंतर इतर लोकही त्यांच्याकडे पाहू लागतात.

अथिया शेट्टी आणि के एल राहुलचे लग्न

अथिया शेट्टी आणि केएल राहुल 2022 च्या सुरुवातीला केएल राहुलसोबत वडील सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्न केले. 

लग्नसोहळ्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी सर्वांचे आशीर्वाद मागितले. या लग्नाला बॉलीवूडचे मोठमोठे सेलिब्रिटी हजर होते.

अथिया शेट्टीचा चित्रपट

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अथिया शेवटची 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटात दिसली होती.  केएल राहुलबद्दल सांगायचे तर तो किरकोळ दुखापतीतून बरा झाला आहे. त्याने श्रीलंकेत सुरू असलेला आशिया कप वगळण्याचा निर्णय घेतला आणि नंतरच्या टप्प्यात खेळणार आहे.

Asia Cup 2025: IND vs PAK मॅच होणार नाही! आशिया कपमधून पाकिस्तान 'आऊट', आता 'या' देशाच्या संघाला मिळणार संधी

Viral Video: लहान मुलांना वाचविण्यासाठी जर्मन शेफर्डने बाल्कनीतून घेतली उडी; पाहा व्हिडिओ

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Viral Video: "असले मित्र नको रे बाबा!" धोकादायक मस्करीचा व्हिडिओ व्हायरल; त्याची 'ही' अवस्था पाहून नेटकरी संतप्त

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

SCROLL FOR NEXT