KK Passes Away  Dainik Gomantak
मनोरंजन

अक्षय कुमारपासून अभिषेक बच्चनपर्यंत, 'या' सेलिब्रिटींनी KK यांना वाहिली श्रद्धांजली

KK Passes Away: लोकप्रिय गायक केके यांचे कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ केके यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने केके यांचा मृत्यू झाला. सुमारे तासभर कॉन्सर्टमध्ये गाऊन झाल्यावर केके आपल्या हॉटेलवर परतले, तेव्हा अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. केके यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटींनी केकेला सोशल मिडियावर श्रद्धांजली वाहली. (KK Passes Away celeb reaction on social media)

बॉलीवूडमधील कलाकारांपासून ते गायकांपर्यंत सगळेच केके यांची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. केके यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारलाही (Akshay Kumar) धक्का बसला आहे. अक्षयने रात्री उशिरा ट्विट करून केके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, 'केके यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले आणि धक्का बसला. ओम शांती'.

अजय देवगणने ट्टिट करत लिहिले-
थेट परफॉर्मन्सनंतरच केकेच्या निधनाची बातमी भयानक आहे. मी ज्या चित्रपटांशी निगडीत होतो त्यांच्यासाठी त्यांनी गायले होते, त्यामुळे त्यांचे जाणे खूप वैयक्तिक वाटते. RIP #KrishnakumarKunnath.

सलीम मर्चेंट ने ट्वीट करत दुख व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT