KK Daughter Taamara
KK Daughter Taamara Insta/Taamara
मनोरंजन

KK ची मुलगी तमाराने केला पहिला लाईव्ह कॉन्सर्ट, शानने दिली साथ

दैनिक गोमन्तक

KK Daughter Taamara: गायक केके यांनी 31 मे रोजी या जगाचा निरोप घेतला. केके यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे कुटुंब एकटे पडले आणि सर्वांनी दिवंगत गायकाला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर केकेची मुलगी तमाराने आता पहिल्यांदाच लाइव्ह परफॉर्म केले आहे आणि त्या वेळी तिला तिच्या वडिलांची आठवण झाली. केकेचा चांगला मित्र गायक शानने या शोमध्ये तमाराला साथ दिली. तमाराने सोशल मीडियावर पोस्ट करत केकेची आठवण काढली आहे.

तमाराने तिच्या लाइव्ह कॉन्सर्टमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती शानसोबत गातांना दिसत आहे. यावेळी आपल्या वडीलांची आठवण काढत तमारा भावूकही झाली. आणि माल इथे बघून पप्पांना आनंद होत असल्याचे भावूक कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने KK चा मृत्यू

केकेंचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पोलिसांनी सांगितले की केके एका लाइव कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होते. त्यादरम्यान त्यांना अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

200 हून अधिक गाणी गायली

KK यांचा जन्म 23 ऑगस्ट 1970 रोजी केरळमधील त्रिशूर येथे झाला. केकेने आपल्या गायन कारकिर्दीत 200 हून अधिक गाणी गायली आहेत. याशिवाय त्यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, मराठी, बंगाली आणि गुजराती भाषेतही अनेक गाणी गायली आहेत. इतकंच नाही तर अनेक जाहिरातींच्या जिंगल्सनाही त्यांनी आपला आवाज दिला आहे. केके त्यांच्या सुरेल आवाजासाठी आणि रोमँटिक शैलीसाठी ओळखले जात होते. 90 च्या दशकात 'यारो' या गाण्याने त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. आपल्या कारकिर्दीत, त्यांनी तडप-तडप (हम दिल दे चुके सनम), कोई कहे कहता रहे (दिल चाहता है), ओ हमदम सुनियो रे (साथिया), ओ जाना (तेरे नाम), यासह अनेक उत्कृष्ट गाण्यांना आपला आवाज दिला. चले जैसे हवाये (मैं हूं ना), आशाएं (इकबाल) अशा कितीतरी हिट गाण्यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT