konkona sen Dainik Gomantak
मनोरंजन

Killer Soup: महिलांना एका चौकटीत किंवा मर्यादित ठेवणे योग्य नाही: कोंकणा सेन

असे करून आपणच समाजाला नुकसान पोहोचवत आहोत. तसेच महिलांना एका चौकटीमध्ये बांधून ठेवतो. प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य वेगळे असते त्यामुळे त्यांना जसे आयुष्य जगायचे आहे तसे जगु द्या.

Puja Bonkile

konkona Sen: अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. कोंकणा सेन शर्मा ही एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक प्रतिभावान सह-दिग्दर्शिका देखील आहे. अलिकडेच तिच्या 'किलर सूप' या वेब सीरिजमध्ये केलेल्या दमदार भूमिकेमुळे ती चर्चेत आली आहे. एका वृत्तासोबत तिने अभिनय, दिग्दर्शक, मातृत्व यासारख्या गोष्टींवर दिलखुलास चर्चा केली.

वेब सीरिजमधील स्वाती या पात्राबद्दल बोलताना कोंकणा म्हणाली, मी स्वातीला कधीही नकारात्मक महिला म्हणून पाहिले नाही. तिचा प्रवास पाहिला तर अनेक महिला तिच्याशी रिलेट करू शकतात. ती एक नर्स होती, तिचे करिअर होते. तिने ते सोडले आणि नंतर लग्नबंधनात अडकली. तिला एक मुलगा आहे, जो मोठा झाला आहे, त्यामुळे आता वयाच्या 40 व्या वर्षी तिला स्वतःसाठी काहीतरी करायचे आहे. मात्र, तिचे कुटुंब तिला साथ देत नाहीत. तिने विचारही केला नसेल, ती अशा प्रवासावर जिथे अनेक मृत्यू होत आहेत.

पुढे एका महिलेची खरी ताकद काय असते? यावर बोलताना ती म्हणाली, महिलांना एका चौकटीमध्ये बांधून ठेवतो. पण प्रत्येक महिला वेगळी असल्याने सगळ्या महिलांची ताकद एकसारखी नसते. त्यामुळे महिलांनी असेच वागावे आणि पुरूषांनी तसे वागावे अशी चौकट तयार करू नये. असे करून आपणच समाजाला नुकसान पोहोचवत आहोत. प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य वेगळे असते त्यामुळे त्यांना तसे जगु द्यावे.

पुढे बोलताना कोंकणा म्हणाली की, तिने 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने फक्त दोन प्रकल्प दिग्दर्शित केले आहेत. तिला एखाद्या अभिनेत्यासारखा विचार करण्याची आणि दुसऱ्याचे व्हिजन रूपेरी पडद्यावर आणण्याची सवय आहे. जेव्हा ती अभिनय करते तेव्हा ती संपूर्ण चित्रपटाचा विचार करत नाही, ती फक्त तिच्या पात्राचा विचार करते.

एक आई म्हणून मुलाला काही खास शिकवले आहे, याबद्दल सांगताना कोंकणा म्हणाली की, इतरांपेक्षा वेगळे असण्यात काहीच गैर नाही. ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही तुमच्या मुलाला एका ओळीत शिकवू शकता. तुमच्या आयुष्यातील निर्णयांद्वारे आणि अनेक वर्षांच्या संभाषणांमधून, तुम्ही हे शिकण्यास सक्षम असाल की तुम्ही इतरांसारखे असणे आवश्यक नाही. सर्व काही जसे आहे तसे असणे आवश्यक नाही. इतर लोकांच्या अपेक्षांनुसार तुम्हाला तुमचे जीवन जगण्याची गरज नाही.

वेबसीरिजबाबत ती म्हणाली की, 'माझ्यासाठी हा खूप वेगळा अनुभव होता, कारण मी असा कोणताही क्राइम थ्रिलर सीरीजसारख्या लाँग फॉरमॅटमध्ये केलेला नाही. तसेच मला अशी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली नाही. मला अभिषेक चौबे आणि मनोज बाजपेयींसोबत काम करायचं असतं तर मी कोणतंही कॅरेक्टर केलं असतं. पण एवढी दमदार भूमिका आणि प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळेल असं वाटलं नव्हतं. त्याच्या शूटिंगसाठी आम्ही तीन महिने सतत केरळमध्ये होतो.

ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये खूप पाऊस आणि थंडी होती आणि खूप अडचणी होत्या. कारण आम्ही इतके दिवस कुटुंबापासून दूर होतो. मी दर महिन्याला माझ्या मुलाला भेटायला मुंबईत येत असे. दिवाळीच्या सुट्टीत माझा मुलगाही शूटिंगसाठी आला होता. तो मला लाइन्स लक्षात ठेवायला मदत करायचा. बाकी, संपूर्ण कलाकार आणि क्रू एका कुटुंबासारखे झाले होते, या शब्दात तिने आपला अनुभव सांगितला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT