Bhool Bhulaiyaa 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Bhool Bhulaiyaa 2: कियारा अडवाणीचा मोशन पोस्टर आउट

काही दिवसांपूर्वीच 'भूल भुलैया 2' चा टीझर प्रदर्शित झाला होता, ज्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेता कार्तिक आर्यनच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) ची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते. प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीनंतर 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2 Teaser) चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. अलीकडेच कियारा अडवाणीने (Kiara Advani) या चित्रपटामधील आपली एक झलक दाखवणार व्हिडिओ शेअर केला आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियाराने (Kiara Advani) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'भूल भुलैया 2' या चित्रपटामधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने आपली झलक प्रेक्षकांच्या समोर आणली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, या चित्रपटामध्ये ती रीतची भूमिका साकारणार आहे. या पोस्टवरून असे दिसते की, चित्रपटात कियाराच्या आत भूत किंवा आत्म्याची छाया असेल. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता, ज्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या टीझरमध्ये कार्तिकसोबत राजपाल यादवही दिसत आहे.

* यात काय विशेष असेल

चित्रपटाबद्दल बोलताना अनीसने पिंकविलाला सांगितले की हा चित्रपट त्याच्यासाठी खास आहे कारण हा त्यांचा पहिला हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हा विषय वेगळ्या पद्धतीने मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पहिला 'भुल भुलैया' हा कॉमेडी असलेला सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट होता. ही एक हॉरर कॉमेडी आहे. लोकांना पहिल्या भागाची आठवण करून द्यावी, पण त्याचवेळी वेगळा अनुभव द्यावा, हे आव्हान आहे. चित्रपटात कार्तिक, कियाराशिवाय राजपाल यादव आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

Goa Assembly Live: तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी अनिर्णित, पण टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम; 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

Goa Monsoon Vegetables: चिप्स, बर्गर, पिझ्झा नको! गोव्यातील विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळी रानभाज्यांचा आस्वाद

"गोयेंचो ताजमहाल सेंचुरी करता" कला अकादमीला आणखीन 20 कोटींचा खर्च; अधिवेशनापूर्वीच विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT