Kiara Advani Dainik Gomantak
मनोरंजन

Kiara Advani: रणवीर सिंगसोबर काम करण्यासाठी कियाराने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा वाचून व्हाल थक्क

Kiara Advani: आता बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी तिने 'डॉन ३' साठी आकारलेल्या फीमुळे मोठ्या चर्चेत आली आहे.

दैनिक गोमन्तक

Kiara Advani fess for Don 3

बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या चित्रपटांमुळे, तर कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे हे कलाकार चर्चेत असतात. आता बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी तिने 'डॉन ३' साठी आकारलेल्या फीमुळे मोठ्या चर्चेत आली आहे.

फरहान अख्तरने 'डॉन 3'ची घोषणा केल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. मात्र, शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्राच्या जागी कियारा अडवाणीला घेतल्याने काही चाहते नाखूष आहेत तर काही खूप उत्साहित आहेत. या सगळ्या कियाराने या चित्रपटासाठी किती फी घेतली आहे याबद्दल चर्चा होताना दिसत आहे.

बॉलिवूड हंगामा' च्या रिपोर्टनुसार, कियारा अडवाणीने या सिनेमासाठी भरघोस फी आकारत असल्याचे पाहायला मिळत आहे. 'डॉन 3'साठी कियारा अडवाणीने 13 कोटी रुपये घेतले असल्याचा दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत तिने आकारलेली सर्वात मोठी फी आहे. इतकेच नाही तर 'वॉर 2'साठी मिळणाऱ्या फीपेक्षा ही रक्कम 50 टक्के जास्त असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

दरम्यान, डॉनच्या भूमिकेत पुन्हा एकदा शाहरुखला पाहण्यासाठी उत्सुक असणाऱे चाहते मात्र रणवीर किंग खानच्या जागी दिसणार असल्याने नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता कियारा आणि रणवीर डॉन ३ मधून प्रेक्षकांना भूरळ घालणार का आणि हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 'डॉन 3' 2025 मध्ये रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT