Kiara Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Kiara Viral Video : उंच हिल्स घातलेल्या कियाराचा तोल गेला ;पण मदतीला धावला मलायकाचा लाडका अर्जुन

अभिनेत्री कियारा अडवानीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय...

Rahul sadolikar

अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. यावेळी कियारासोबत इतरही अनेक सौंदर्यवतीही दिसल्या.

करीना कपूर, कियारा अडवाणी, सुहाना खान आणि अर्जुन कपूर नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात एकत्र दिसले . यावेळी तिन्ही अभिनेत्री त्यांच्या लूकने सर्वांना थक्क करत होत्या.

कियाराचा तोल गेला आणि..

एका कार्यक्रमातल्या हे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. यातल्या एका व्हिडीओमध्ये कियारा अडवाणीचा अचानक स्टेजवरच तोल गेला आणि ती पडणार होती ; पण इतक्यात अभिनेता अर्जुन कपूरने तिचा तोल सावरला. स्टेजवर कियारा अर्जुनशी बोलत असताना तिचा तोल गेला तेव्हा ही घटना घडली .

करीना कपूरच्या अंगावर पडली असती

व्हायरल व्हिडीओमध्ये कियारा करीनासोबत स्टेजवर दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसल्याप्रमाणे हा कार्यक्रम अर्जुन कपूर होस्ट करत आहे. 

अर्जुनला भेटल्यानंतर कियारा तिच्या सीटवर परत जाऊ लागली तितक्यात तिची हिल सटकते आणि ती तिच्या ड्रेसमुळे अडखळते, परंतु इतक्यात अर्जुन तिला सावरतो, अर्जुनने वेळीच कियाराला सावरलं नसतं तर कियारा मागे बसलेल्या करीनाच्या अंगावर पडली असती. 

कियारा तरीही कूल...

अडखळल्यानंतरही कियाराच्या चेहऱ्यावर कुठंही गोंधळलेपण नव्हतं. तिने स्वत:ला सावरत ती बरी असल्याचे सांगितले. अभिनेत्रीची ही शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडते. कियारा अडवाणीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनाही तिची काळजी वाटू लागली आहे.

 एका चाहत्याने कमेंट केली की, 'मला खात्री आहे की त्याचा पाय किमान आठवडाभर दुखत असेल. बघा कसा वाकला आहे. त्याचवेळी दुसऱ्याने 'मला आशा आहे की तुझा पाय बरा होईल' असे लिहिले.

इव्हेंटमध्ये तीन सौंदर्यवती अभिनेत्री

या इव्हेंटमध्ये कियारा अडवाणीसोबत करीना कपूर, सुहाना खानही दिसली.  करीना कपूर या कार्यक्रमात काळ्या ऑफ-शोल्डर गाउनमध्ये दिसली, तर कियारा अडवाणी एका चमकदार टॉप आणि बॉटममध्ये दिसली. त्याचवेळी सुहाना खान लाल हॉट ऑफ शोल्डर स्लिम फिट ड्रेसमध्ये दिसली.

ब्युटी ब्रँडच्या लाँचसाठी एकत्र

वास्तविक, अभिनेत्री करीना कपूर, कियारा अडवाणी आणि सुहाना खान मुकेश अंबानींच्या कंपनी रिलायन्स रिटेलच्या नवीन ब्युटी प्रोडक्ट ब्रँड 'तीरा'च्या लॉन्चमध्ये एकत्र दिसल्या होत्या . या तिघींना या ब्रँडचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT