Khosla ka Ghosla Dainik Gomantak
मनोरंजन

Khosla ka Ghosla : दोन वर्षे चित्रपट रेंगाळला पण जेव्हा रिलीज झाला तेव्हा प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं

अभिनेते अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्या काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या खोसला का घोसला या चित्रपटाला सुरुवातीला खूपच संघर्ष करावा लागला.

Rahul sadolikar

अनुपम खेर, 2008 मध्ये या कमी बजेटच्या चित्रपटाने तुफानी कामगिरी केली होती. या चित्रपटात एकापेक्षा जास्त स्टार्स होते पण २ वर्ष या चित्रपटाला वितरक मिळाला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 

2 वर्षे वितरकच नाही मिळाला

असे अनेक चित्रपट आहेत की ते कधी आले आणि कधी गेले, याची माहितीही लोकांना मिळत नाही. दुसरीकडे, काही चित्रपट असे आहेत ज्यांची सुरुवात इतकी धमाकेदार आहे की वर्षांनंतरही लोक या चित्रपटाला विसरत नाहीत. 

असाच एक चित्रपट 2008 साली आला होता. म्हणजेच आजपासून 15 वर्षांपूर्वी. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, या चित्रपटाला जवळपास २ वर्षे वितरक मिळू शकला नाही. पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार तर मिळवलाच शिवाय बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली. जाणून घ्या या चित्रपटाबद्दल.

कोणता आहे हा चित्रपट?

हा चित्रपट म्हणजे अनुपम खेर अभिनीत 'खोसला का घोसला' आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलीजसाठी सज्ज असलेल्या या चित्रपटाच्या निर्मात्यांना जवळपास दोन वर्षांपासून कोणताही वितरक सापडला नाही. त्यामुळे हा चित्रपट अडकला. पण नंतर यूटीव्ही मोशन पिक्चर्सने पुढे येऊन चित्रपटाचे वितरण केले.

अनुपम खेर आणि बोमन इराणी

'खोसला का घोसला' या चित्रपटासाठी अनुपम खेर आणि बोमन इराणी यांना सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळालाया चित्रपटात अनुपम खेर यांनी किशोर खोसला यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या कुटुंबाची कथा चित्रपटात दाखवण्यात आली होती. यासोबतच दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जमिनीवर बिल्डर खुराणा यांनी खोटारडेपणा करून अतिक्रमण केल्याचेही दाखवण्यात आले. या विषया भोवती चित्रपटाची कथा फिरते. प्रदर्शित होताच चित्रपटाची प्रचंड वाहवा झाली. 54 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्येही या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

खोसला का घोसलाचं बजेट

'खोसला का घोसला' चित्रपटाचे बजेट 3.75 कोटी होते. त्याच वेळी, रिलीज होताच, बॉक्स ऑफिसवर 6.67 कोटींचा जबरदस्त कलेक्शन झालं. या चित्रपटाची कथा जयदीप साहनी यांनी लिहिली असून दिबाकर बॅनर्जी यांनी दिग्दर्शन केले आहे. दिबाकरचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता.,अनुपम खेर यांनी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यांचे बजेट कमी आहे परंतु कमाई खूप जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT