Khatron Ke Khiladi 13 Contestant Dainik Gomantak
मनोरंजन

Khatron Ke Khiladi 13 Contestant : 'खतरो के खिलाडी' च्या या सिझन मध्ये दिसणार हे स्पर्धक...वाचुन आश्चर्य वाटेल

Rahul sadolikar

 टीव्हीचा सर्वात लोकप्रिय साहसी रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी' 13 धमाकेदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. चाहत्यांमध्ये आताच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. रोहित शेट्टीने आधीच आश्वासन दिले आहे की यावेळी धोकादायक स्टंटचा डोस जास्त असेल. 

नुकतीच या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी लीक झाली असून, त्याबाबतची चर्चा जोर धरू लागली आहे. चला पाहुया यावेळच्या खतरो के खिलाडी चे स्पर्धक कोण असणार आहेत...

खतरों के खिलाडी 13 मध्ये दिसलेल्या स्पर्धकांची संपूर्ण यादी सोशल मीडियावर लीक झाली आहे. बिग बॉस 16 च्या सदस्यांपासून ते टीव्हीवरील प्रसिद्ध व्यक्तींचाही या यादीत समावेश आहे. या यादीत काही धक्कादायक नावे देखील समाविष्ट आहेत, जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

सौंदर्या शर्मा, अर्चना गौतम, प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, असीम रियाझ, दिशा परमार, मुनावर फारुकी, सनाया इराणी, प्रिन्स नरुला, अंजली अरोरा, नकुल मेहता

अलीकडेच बातमी आली की बिग बॉस 16 चे विजेते एमसी स्टेन आणि त्याचा सह-स्पर्धक सुंबूल तौकीर खान यांनी रोहित शेट्टीच्या शोसाठी स्पष्टपणे नकार दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोच्या निर्मात्यांनी त्यांना मोठ्या रकमेची ऑफर दिली होती, परंतु स्टॅन आणि सुंबुलने पैसे मागितल्यानंतरही धोकादायक स्टंट करण्यास नकार दिला.

तेराव्या सीझनचे शूटिंग अर्जेंटिनामध्ये झाल्याची नोंद आहे, जिथे सीझन 9 आणि सीझन 7 शूट करण्यात आले होते. मे महिन्यातच चित्रीकरणासाठी स्पर्धक अर्जेंटिनाला रवाना होतील. 17 जुलैपासून त्याचे टीव्हीवर प्रसारण होणार आहे. 

तसेच तुम्ही ते OTT वर देखील पाहू शकाल. यावेळी स्टंटबाजीतील धोक्यांचा डोस जास्त असेल, अशी अपेक्षा आहे. थोडक्यात यावेळच्या खतरों के खिलाडीचा सिजन रंगणार हे निश्चित

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT