KGF chapter 3 News Dainik Gomantak
मनोरंजन

'रॉकी भाईच्या आयुष्यात खूप काही बाकी', अभिनेता यशने भाग 3 बद्दल केला खुलासा

रमिका सेनने रॉकी भाईसाठी डेथ वॉरंट जारी केले पण...

दैनिक गोमन्तक

यशचा स्टारर 'KGF Chapter 2' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. प्रेक्षकांना हा चित्रपट इतका आवडला आहे की आता चाहत्यांना त्याच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. KGF Chapter 2 मध्ये, यशने त्याच्या धमाकेदार अभिनयाने आणि स्फोटक दृश्यांनी थिएटर्सवर अधिराज्य गाजवले. त्याचाच परिणाम असा झाला की या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. केवळ प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटी ही यशचे चाहते झाले आहेत. इतकंच नाही तर 14 एप्रिलला रिलीज झालेला हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आहे आणि चांगली कमाई करत आहे. दरम्यान, यशने KGF चॅप्टर 3 बद्दल सांगितले आहे. (kgf chapter 3 come soon yash and prashant planning for part 3)

दिलेल्या मुलाखतीत यशने चित्रपटाच्या तिसऱ्या भागाविषयी चर्चा केली. पुढच्या भागातही धमाकेदार सीन असतील आणि त्याची कथाही वेगळी असेल, असं त्यांनी सांगितलं. रॉकीच्या आयुष्यात आणि त्याच्या कथेत अजून खूप काही बाकी आहे, जे तिसऱ्या भागात दाखवले जाईल.

यश पुढे म्हणाला की, प्रशांत आणि मी KGF 3 साठी खूप सीन्स प्लॅन केले आहेत. अशा अनेक गोष्टी होत्या ज्या आम्ही KGF 2 मध्ये दाखवू शकलो नाही. म्हणूनच आम्ही ती दृश्ये KGF 3 साठी ठेवली आहेत.

KGF 2 आणि KGF 3 चे कोणतेही नियोजन नव्हते

पुढे बोलताना यशने सांगितले की प्रशांत नीलने यापूर्वी केवळ एक सामान्य चित्रपट म्हणून KGF बनवण्याची योजना आखली होती. यापूर्वी त्याने याच्या सिक्वेलचा विचार केला नव्हता.

पण, जेव्हा चित्रपटाच्या निर्मितीचे अर्धे काम पूर्ण झाले, तेव्हा टीमने चित्रपटाच्या स्क्रिप्टवर पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला. ज्याचा परिणाम असा झाला की हा चित्रपट एक नव्हे तर दोन भागात बनणार होता. त्यानंतर आम्ही 'KGF Chapter 2' मध्ये चित्रपटाचे सर्वोत्कृष्ट सीन्स टाकले होते.

मला भीती होती की चित्रपट फ्लॉप होणार नाही : यश

जेव्हा हा चित्रपट हिट झाला तेव्हा अभिनेता म्हणाला, "पहिला भाग फ्लॉप झाला, तर दुसऱ्या भागात आपण काम करू शकणार नाही, अशी भीती वाटत होती. पण, पहिला आणि दुसरा भाग सुपरहिट होताच आम्ही पुढच्या कथेवर काम करायला सुरुवात केली. आता आम्ही पुढील भागावर काम करत आहोत.

दुसऱ्या भागासाठी खूप वाट पाहावी लागली

KGF Chapter 2 चा क्लायमॅक्स अपूर्ण राहिला आहे. शेवटी, रमिका सेनने रॉकी भाईसाठी डेथ वॉरंट जारी केले. त्यानंतर रॉकी मरेल की जगेल? यावर एकही सीन नाही. लोकांची उत्सुकता वाढवण्यासाठी फक्त अर्धा सीन देऊन चित्रपट संपवण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT