KGF 2 poster Twitter
मनोरंजन

यशच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार; थेटरमध्ये झळकणार KGF 2

दैनिक गोमन्तक

2018 साली प्रदर्शित झालेल्या KGF 1 या कन्नड चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच KGF 2 ची वाट पाहत आहेत. ज्याप्रमाणे प्रेक्षक 'बाहुबली' या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते, त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये KGF 2 आतुरता पाहायला मिळणार आहे. मात्र आता त्यांचा आवडता अभिनेता यशच्या बहुप्रतिक्षित शानदार चित्रपट KGF 2 लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पहिला भाग पाहिल्यापासूनच प्रेक्षक त्याच्या सिक्वेलची वाट पाहत होते, पण कोरानाच्या कालावधीमुळे चाहत्यांची प्रतीक्षेत भर पडत गेली. मात्र आता सिनेरसिकांना जास्त वाट बघावी लागणार नाही. कारण निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

इतकंच नाही तर या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता आणखी न वाढवत निर्मात्यांनी अ‍ॅक्शनबाझ चित्रपटाच्या ट्रेलरची तारीखही जाहीर केली आहे. सोशल मीडियावर ही बातमी शेअर करताना दिग्दर्शक प्रशांत नील यांनी “वादळापूर्वी नेहमीच गडगडाट होत असतो! #KGFCchapter2 चा ट्रेलर 27 मार्च रोजी संध्याकाळी 6.40 वाजता येणार आहे, अशी पोस्ट केली.

कन्नड भाषेत बनलेला हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. KGF 2 यावर्षी 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. झी तमिळ, झी तेलुगू, झी केरलम आणि झी कन्नडने चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क विकत घेतले आहेत.

या चित्रपटात रवीना आणि संजय दत्त देखील दिसणार असून, चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणे यश आणि श्रीनिधी शेट्टी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय रवीना टंडन आणि संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात संजय अधीराची म्हणजे नकारात्मक भूमिका साकारणार असून, त्याचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. जो प्रेक्षकांना चांगलांच आवडला. कोरोनामुळे चित्रपटाची रिलीज डेट अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षांच्या भेटिला येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT