KGF-2 Dainik Gomantak
मनोरंजन

KGF-2 चित्रपटाची 100 कोटी क्लबमध्ये एंट्री

चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे 46.79 कोटींची कमाई केली.

दैनिक गोमन्तक

साऊथचा सुपरस्टार यशचा चित्रपट KGF 2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीज होताच या चित्रपटाने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांना मागे टाकले आहे. यशचा चित्रपट KGF 2 ने पहिल्या दिवशी 54 कोटींची कामाई केली होती. (KGF 2 movie enters 100 crore club)

चित्रपटाने (Movie) दुसऱ्या दिवशीही कमाल केली आहे. यशच्या KGF 2 ने अवघ्या दोन दिवसात 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली आहे. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे 46.79 कोटींची कमाई केली. यासह चित्रपटाच्या कमाईचा एकूण आकडा 100.74 कोटींवर गेला आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे शेअर केले.

त्यांच्या मते, KGF 2 हा रेकॉर्ड ब्रेकर चित्रपट ठरत आहे. 4 दिवसांच्या दीर्घ सुट्ट्यांमद्धे चित्रपट 185 कोटींची कामाई करेल अशी अपेक्षा आहे. KGF-2 ने वॉर आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान सारख्या चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. देशातच नाही तर परदेशातही यशच्या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. KGF-2 ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर (Box Office) 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. KGF 2 मध्ये यश व्यतिरिक्त संजय दत्त आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सुट्टीला समुद्रकिनारी 24 तास जीवरक्षक

Goa Politics: खरी कुजबुज; ‘ते’ माजी आमदार पुन्हा उतरणार रिंगणात?

Vasco Market: '..तर पालिकेसमोर मासे विकू'! वास्कोतील विक्रेत्यांचा पवित्रा; अन्यत्र मासळी विक्री बंदी, सायबिणीच्या स्थापनेची मागणी

Goa coastal survey: गोवा मुक्तीनंतरचे सर्वात मोठे सर्वेक्षण! किनारी भागांत धास्ती; बेकायदा बांधकामांवर होणार कारवाई

GCA: अखेर विषय संपला! रोहन गावस देसाईच ‘जीसीए’चे प्रतिनिधी; BCCI निवडणुकीसाठी शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT